शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

नांदेडमध्ये आजपासून होणार तूर खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 12:28 AM

नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी शासकीय गोदामात जागा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती आली़ दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या सहकार्याने नाफेडचे डीएमओ रामप्रसाद दांड यांच्या प्रयत्नांना यश आले़ जिल्ह्यात तूर साठविण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध झाली असून सोमवारपासून तूर खरेदी केंद्र पुन्हा कार्यान्वित होणार असल्याची माहिती डीएमओ रामप्रसाद दांड यांनी दिली़

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने जागेचा तिढा सुटला; तीन ठिकाणी जागा उपलब्ध

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नाफेडमार्फत खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी शासकीय गोदामात जागा उपलब्ध नसल्याने तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते़ यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती आली़ दरम्यान, जिल्हाधिका-यांच्या सहकार्याने नाफेडचे डीएमओ रामप्रसाद दांड यांच्या प्रयत्नांना यश आले़ जिल्ह्यात तूर साठविण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध झाली असून सोमवारपासून तूर खरेदी केंद्र पुन्हा कार्यान्वित होणार असल्याची माहिती डीएमओ रामप्रसाद दांड यांनी दिली़शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ या खरेदी केंद्रावर मागील वर्षी जवळपास १ लाख ९८ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ सदर तूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ताब्यात असून अद्याप तो माल विकलेला नाही़ तसेच नव्याने आलेले सोयाबीन, उडीद, हळद, तसेच यंदा खरेदी केलेली जवळपास ९२ हजार ३८१ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या विविध ठिकाणच्या गोदामात साठविण्यात आली आहे़त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने तूर खरेदीला ब्रेक लावण्याची वेळ नाफेडवर आली होती़ दरम्यान, खरेदी बंद झाल्याने शेतकºयांनी रोष व्यक्त केला होता़ तसेच इतर तालुक्यातील माल दुसºया तालुक्यातील गोदामात साठविला जात असल्याने शेतकºयांनी तो माल अडवून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटनाही धर्माबादमध्ये घडली होती़ दरम्यान, नाफेडचे जिल्हा व्यवसाय अधिकारी रामप्रसाद दांड यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेडसह जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला़ आजघडीला नांदेड वेअर हाऊसमधील २०० मेट्रीक टन सोयाबीन तसेच धर्माबाद आणि लोहा येथील गोदामातील सोयाबीनची खासगी व्यापाºयांना नाफेडमार्फत विक्री करण्यात आली़ सदर माल तत्काळ व्यापाºयांनी उचलल्यामुळे मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध झाली आहे़ तर जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास एक खासगी गोदाम भाड्याने मिळाले आहे़ या ठिकाणी जवळपास ४० हजार क्विंटल तूर साठविण्याची क्षमता आहे़ नांदेड येथील गोदामात नांदेड, अर्धापूर, हदगाव, किनवट, भोकर या ठिकाणी खरेदी केलेला माल तर धर्माबाद येथे बिलोली, नायगाव, मुखेड येथील तूर साठविण्यात येईल़२३ हजार शेतकºयांनी केली नोंदणीआजपर्यंत २३ हजार ९२ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी ९ हजार १३३ शेतकºयांनी जवळपास ९२ हजार ३८१ क्विंटल माल नाफेडला दिला आहे़ १३ हजार ९५९ शेतकºयांचा माल अद्याप खरेदी करणे शिल्लक आहे़ उर्वरित शेतकºयांकडून जवळपास दीड लाख क्विंटल तूर येईल, अशी अपेक्षा आहे़४त्याचबरोबर सोमवारपासून सर्वच केंद्रावर चणा खरेदी केला जाणार आहे़ आजपर्यंत २४४ क्विंटल चना खरेदी केला आहे़ चणा उत्पादक २ हजार ५०७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ १८ एप्रिलपर्यंत तूर खरेदी केली जाणार आहे़ नोंदणी केलेल्या शेतकºयाच्या संख्येनुसार तूर आणि चण्याची आवक वाढणार असल्याचे चित्र आहे़

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorतहसीलदार