शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा डाव : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:06 PM

निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा कुटील डाव असल्याचे सांगत यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी केला़

नांदेड : आपण काय बोलतो आहोत, याचे कसलेही ताळतंत्र नसलेल्या माणसाच्या तोंडून चिथावणीखोर वक्तव्य घेऊन त्यांना प्रसिद्धी दिली जात आहे़ हा निवडणुकांच्या तोंडावर दंगली घडविण्याचा भाजपाचा कुटील डाव असल्याचे सांगत यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी केला़

वंचित बहुजन यात्रेच्या निमित्ताने नांदेड येथे आलेल्या अ‍ॅड़आंबेडकर यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला़ सामाजिक स्वातंत्र्यासाठी डॉ़बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले़ मनुस्मृती सांगत असलेली अमानवी व्यवस्था समाजाच्या हिताची नाही़ त्यामुळेच त्यांनी मनुस्मृतीला नाकारले़ हा इतिहास असताना असंबंध वक्तव्य करणाऱ्या माणसाला प्रसिद्धी दिली जात आहे़ चुकीचा प्रचार केला जात आहे़ यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासह हिंदूत्ववादी संघटनेचे प्रचारक सामील आहेत़ त्यात इलेक्ट्रॉनिक मिडियाही सहभागी असल्याचे स्पष्ट होत आहे असे अ‍ॅड़आंबेडकर यावेळी म्हणाले़  भाजपा, स्वयंसेवक संघ हे लोकशाहीवादी नाहीत़ तर ते वैदिक विचारसरणीला मानतात़ तर महाराष्ट्रातला वारकरी वर्ग लोकशाहीवादी आहे़ त्यामुळेच आता संघ आणि त्यांचे प्रचारक वारकऱ्यांच्या मागे लागल्याचा आरोपही त्यांनी केला़ 

केंद्र सरकारच्या कारभारामुळे संविधान धोक्यातकेंद्र सरकारच्या एकूण कारभारामुळे देशातील संविधान धोक्यात आले आहे़ त्यामुळेच काँग्रेससह समविचारी पक्षांनी एकत्रित येवून आगामी निवडणुकांना सामोरे जावे अशी आमची भूमिका आहे़ लोकशाहीच्या सामाजिककरणाची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, असे आम्हाला वाटते़ त्यामुळेच महाराष्ट्रात विखुरलेल्या वंचित समाजाला सोबत घेण्याची आवश्यकता आहे़ काँगे्रसने आघाडीमध्ये वंचित घटकातील धनगर आणि माळी या समाजातील दोघांना, छोट्या ओबीसीतील दोघांना, भटक्या विमुक्तासाठी दोन आणि मुस्लिम समाजातील दोघांना अशा १२ जागा द्यायचे मान्य केल्यास आम्ही काँग्रेससोबत जाऊ़ आम्ही प्रस्ताव दिला आहे, आता निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे, असे सांगत राष्ट्रवादीसोबत मात्र सध्या तरी कुठलीही चर्चा नसल्याचे अ‍ॅड़ आंबेडकर यांनी स्पष्ट केले़ राष्ट्रवादीने समाजातील छोट्या घटकाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलावी, अन्यथा त्यांच्यासोबत पुढेही चर्चा होणार नाही, असे ते म्हणाले़ 

कोणाबरोबर जायचे ते योग्यवेळी ठरवू़ एमआयएम संदर्भात एका मौलवींनी आमच्याकडे आघाडी संदर्भात चर्चा केली़ मात्र ओवेसी अथवा एमआयएममधील इतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झालेली नाही़ मात्र कोणाबरोबर जायचे ते आम्ही योग्यवेळी ठरवू़ एमआयएम संदर्भात कोण काय म्हणते, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही़ आमचा स्वतंत्र पक्ष आहे़ या देशात ज्यांचा सर्वधर्मसमभावावर विश्वास आहे, देशाचे संविधान जे मानतात, यात एमआयएम बसत असेल तर त्यांनाही सोबत घेऊ, असेही अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले़ लहान ओबीसी समुहात आपल्याला वापरल्या जात आहे़ व्यवस्थेबाहेर ठेवले जात आहे़ याची जाणीव होत आहे़ हा वंचितपणा घालविण्यासाठी अगोदर श्रेष्ठत्वाची संकल्पना संपविली पाहिजे़ हेच काम वंचित बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून सुरू केल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले़  यावेळी माजी आ़हरिभाऊ भदे, विजयराव मोरे, रामचंद्र येईलवाड, इलियास सय्यद, नागोराव शेंडगे, प्रा़यशपाल भिंगे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ 

वंचित बहुजन आघाडीला वाढता प्रतिसादपोटासाठी भिक्षा मागणाऱ्या पाच जणांची निर्घृण हत्या झाली़ ही घटना अत्यंत दु:खदायक होती़ आजही गावपातळीवरील व्यवस्था कशा पद्धतीची आहे, यातून पुढे झाले़ या घटनेनंतर आम्ही पुण्यामध्ये बैठक घेतली़ या बैठकीत वंचित बहुजन आघाडीची संकल्पना पुढे आली़ गावागावात संख्येने कमी, परंतु मतदारसंघात निर्णायक असणारे हे छोटे घटक आहेत़ या घटकांनी एकमेकांना स्वीकारले पाहिजे़ या विचारातून वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्याचे सांगत ११ जिल्ह्यांत या आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद दिलासादायक असल्याचे सांगत अगोदर सामाजिक बदल आणि त्यानंतर राजकीय अशी यामागची भूमिका असल्याचे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर म्हणाले़

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाElectionनिवडणूकGovernmentसरकार