शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

"मी मुख्यमंत्री असतो तर..."; नांदेडला मंत्रीपद न मिळाल्याने अशोक चव्हाणांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:14 IST

भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे.

Ashok Chavan on Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरात पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र काही जिल्ह्यातील नेत्यांची मंत्रि‍पदाची इच्छा पूर्ण न झाल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनींही नांदेडला मंत्रिपद न मिळाल्याने खंत बोलून दाखवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले.  तर एक पद अद्याप रिक्त आहे. महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असा विभागीय समतोल राखण्यात आला. मात्र मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्याने माजी  मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे. नांदेडला भविष्यात कधी ना कधी मंत्रीपद मिळेल अशी आशा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

"यावेळी परभणी, बीडला संधी मिळाली. त्यामुळे आम्हाला त्याचाही आनंद आहे. मराठवाडा म्हटल्यानंतर इतरही जिल्ह्यांना संधी मिळणे आवश्यक होती. नांदेडलाही भविष्यात कधी ना कधी मिळेलच," असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं

यावेळी अडीच वर्षांनी नांदेडला मंत्रीपद मिळेल का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी, "मी मुख्यमंत्री असतो तर, विचार केला असता. पण मी मुख्यमंत्री नसल्याने सांगता येत नाही," असं म्हटलं.

सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्रीपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. शंभूराज देसाई (पाटण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. तर पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडBJPभाजपा