शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

भाजपा सरकार शेतक-यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:44 AM

केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्देमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी / माहूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेवटी कुणासाठी राज्य करीत आहे, असा थेट सवाल करीत गत साडेतीन वर्षांत एकही हिताचा निर्णय या सरकारने घेतला नाही़ शिक्षक, नोकरदार, उद्योजकासह सर्वजण मेटाकुटीला आले असून हे सरकार शेतक-यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त उमरी आणि माहूर येथे आयोजित सभांमध्ये ते बोलत होते़ उमरीच्या मोंढा मैदानावर झालेल्या हल्लाबोल मोर्चाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. विक्रम काळे, माजीमंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, नगराध्यक्षा अनुराधा खांडरे, कल्पना पाटील डोंगळीकर, संग्राम कोते पाटील, बसवराज नागराळकर, ईश्वर बालबुद्धे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, भाजपा सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली. आजवर एकाही शेतकºयाच्या खात्यात कर्जाची रक्कम भरण्यात आली नाही. शरदचंद्र पवार यांनी केंद्रात असताना ७१ हजार कोटींची कर्जमाफी दिली़ परंतु, कसलाच आॅनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती न करता सरसकट कर्जमाफी दिली. नव्याने निर्माण झालेले तेलंगणा राज्य शेतकºयांना २४ तास मोफत वीज देण्याची घोषणा करते़ परंतु, राज्य निर्मितीला ५७ वर्षे पूर्ण होवून महाराष्ट्रात अद्याप आठ तास वीज बरोबर मिळत नाही. उलट हे सरकार विजेचे कनेक्शन तोडायला निघाले. आम्ही गोदावरी नदीवर नाथसागरपासून बाभळीपर्यंत १२ बॅरेजेस बांधले. नांदेड जिल्ह्यात या भाजपा सरकारने एकही धरण बांधले नसल्याचा आरोप पवार यांनी केला़ महिलांवरील अत्याचार वाढले, शिष्यवृत्तीसाठी यांच्याकडे पैसा नाही. एकाही तरुणाला रोजगार दिला नाही. नांदेडमध्ये एकही नवीन कारखाना या सरकारने आणला नाही. सोयाबीन, कापसाला भाव नाही. पीकविम्याचे पैसे देण्यासाठी सरकार चालढकल करीत आहे. एकंदरीत शेतकºयांच्या कुठल्याच प्रश्नावर भाजप सरकार गंभीर नसून केवळ फसव्या जाहिराती व पोकळ आश्वासने देवून महाराष्टÑातील जनतेला गाजर दाखविले असा आरोप पवारांनी केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर टीका करताना राज्यात १४०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन सरकार अनेकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत असून सामान्य माणसाला जगणे कठीण झाल्याचे सांगितले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, ‘देश बदल रहा है’ म्हणणाºयांना आता महाराष्टÑ बदललल्याचे नक्कीच लक्षात येईल. मंत्रिमंडळातील एकही मंत्री शेतकरी नाही. त्यामुळे त्यांना शेतकºयांचे प्रश्न कळणार नाहीत. यावेळी सभापती शिरीषराव गोरठेकर, ईश्वरराव भोसीकर, राजेश देशमुख, प्रवीण सारडा, तालुकाध्यक्ष मारोतराव कवळे, कैलासराव गोरठेकर, राजेश कुंटूरकर, भास्कर भिलवंडे, जि. प. सदस्या ललिता यलमगोंडे, संगीता जाधव, खाजासेठ कुरेशी, पल्लवी मुंगल, रमेश सरोदे, गणेशराव गाढे उपस्थित होते़ सूत्रसंचालन सदाशिव पुपुलवाड यांनी तर डॉ. विक्रम देशमुख यांनी आभार मानले.उद्धव ठाकरे आमदाराला भीत आहेतशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर पूर्वी त्यांचे आमदार उभे राहण्याची हिंमत करीत नव्हते़ आज त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हेच आमदारांसमोर थरथर कापत आहेत. शिवसेनेचा आता कसलाच धाक राहिला नसल्याचे सांगत अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली.