गैर समजातून तुटणारा संसार जुळविण्यात बिलोली पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 19:19 IST2020-10-30T19:17:34+5:302020-10-30T19:19:26+5:30
सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले.

गैर समजातून तुटणारा संसार जुळविण्यात बिलोली पोलिसांना यश
बिलोली : किरकोळ वादाच्या गैरसमजुतीतून गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक संसारातून एकमेकांपासून अलिप्त राहून घटस्फोटाच्या अंतिम टोकाला गेलेला वाद मिटवून त्या कुटुंबांचा विस्कटलेला संसार सामोपचाराने जुळविण्याचा यशस्वी प्रयत्न बिलोली पोलिसांच्या मदतीने झाल्याने मौ.केसराळी व कासराळी येथील दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा वाद इतका विकोपाला गेला की, गेल्या दोन वर्षापासून विवाहिता आपल्या माहेरी होती. सासरच्या मंडळीने व माहेरच्या मंडळीने दोघांनाही समजण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांत त्याना अपयशच आले. शेवटी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूचनेप्रमाणे डॉ .के.बी.कासराळीकर व पोलीस निरीक्षक डोईफोडे यांच्या पुढाकारातून दोन्ही कुटुंबियांना २७ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन बिलोली या ठिकाणी एकत्र आणून दोघांची काय अडचण आहे. दोघांमध्ये वाद कशामुळे विकोपाला गेला या सर्व गोष्टीची सखोल माहिती घेऊन दोन्ही कुटुंबाची मने जुळवण्याचा आटोकाट यशस्वी प्रयत्न करुन एक-दोन दिवसांत घटस्फोट होणार, असे चित्र निर्माण झालेले सताना डॉ. के.बी कासराळीकर, आनंद पाटील बिराजदार, माजी तालुकाध्यक्ष भाजपा तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील शिंपाळकर, पोलीस जमादार बोधने, केसराळीचे माजी सरपंच इब्राहिम शेख, राम पाटील काळे, नागनाथ पाटील, माजी सरपंच सटवाजी सोनकांबळे, किशन मेहेत्रे, विठ्ठल शिरोळे आदींच्या उपस्थितीत तुटणारे संसार जुळवण्यात यश आले.
गैरसमजुतीमुळे वाद वाढत गेला
असे म्हणतात ना, ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, या उक्तीप्रमाणे म.रा.रो.हमी योजनेचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.के.बी.कासराळीकर व पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे हे घटस्फोटाच्या टोकाला गेलेले कासराळी येथील एकाचा विवाह केसराळी येथील एका महिलेसोबत गेल्या नऊ ते दहा वर्षापूर्वी रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. काही वर्षानंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशा दोन अपत्याना जन्म दिले. मध्यंतरीच्या काळात दोघा नवरा बायकोच्या गैरसमजुतीमुळे वाद होत गेला.