शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

बिलोलीत पुढाऱ्यांकडून मतदारांची मनधरणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:32 AM

२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे बिलोली तालुक्यातही वाहू लागले आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मते खेचण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलोकसभा रणधुमाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते सक्रिय झाले प्रचारासाठी

शेख इलीयास।बिलोली : २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे बिलोली तालुक्यातही वाहू लागले आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मते खेचण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. कोणत्या भागात कोणत्या समस्या आहेत, त्या शोधून त्यांची सोडवणूक, निराकरण करण्याची ग्वाही नेत्यांकडून दिली जात आहे. दरम्यान, प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत येणार आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसे काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे नेतेमंडळी कार्यक्रमाचे औचित्य साधत स्वत: जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेच्या दृष्टीने अनेक नेते मंडळींनी आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपाला फसव्या योजनांचा परिणाम यंदा भोगावा लागणार आहे. बिलोली तालुक्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्याप्रमाणेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांचेही या तालुक्यात कार्यकर्त्यांचे चांगले नेटवर्क आहे. नायगाव-उमरी-धर्माबाद विधानसभा मतदारसंघावर डॉ.मीनल खतगावकर यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्या तुलनेत लोकसभेच्या अनुषंगाने अद्यापही भाजपाकडून जोर लावल्याचे दिसत नाही. त्या तुलनेत काँग्रेस लोकसभेसाठी कामाला लागल्याचे दिसते.बिलोली तालुक्यातील पंचायत समिती, कुंडलवाडी नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती या भाजपाच्या ताब्यात आहेत. तर बिलोली नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. बिलोली तालुक्यात शिवसेनेची स्थिती फारशी मजबूत नसताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पा.खतगावकर व जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्या राजकीय तडजोडीतून शिवसेनेचे आ.सुभाष साबणे विजयी झाले़ मात्र, राज्यात तसेच केंद्रात सेना-भाजपाची सत्ता असतानाही तालुक्यात मोठी विकासकामे झाल्याचे दिसत नाही. याचा फायदा काँग्रेस कशी उचलते ते पहावे लागणार आहे. आगामी विधानसभेची लढत ही शिवसेनेचे आ.सुभाष साबणे व काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यातच होण्याचे संकेत मिळत असल्याने हे दोन्ही नेते लोकसभेला आपल्याच पक्षाला मतदान मिळावे यासाठी आग्रही असतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या दोघांचाही कस लागलेला दिसेल. एकूणच उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर तालुक्यात प्रचाराला वेग आलेला दिसेल. यासाठीची ही रणनीती आखली जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक