भरधाव कार अन् थारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:14 IST2025-03-04T14:13:41+5:302025-03-04T14:14:07+5:30

भाच्याचा अपघातानंतर लागलीच झाला मृत्यू तर मामाचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान झाला मृत्यू

bharadhaava-kaara-ana-thaaracai-samaoraasamaora-dhadaka-bhaisana-apaghaataata-maamaa-bhaacayaacaa-martayauu | भरधाव कार अन् थारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू

भरधाव कार अन् थारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात मामा-भाच्याचा मृत्यू

-मारोती चिलपिपरे 
कंधार (नांदेड) :  ताडकळस ते पालम रस्त्यावर धानोरा काळे गावाजवळ सोमवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता कार आणि थार जीपचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात भाचा जागीच ठार तर मामाचा आज, मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲड. अभिजीत रामदास राठोड (३२) आणि राहुल आविनाश पवार (४१) अशी मृतांची नावे असून ते नात्याने मामाभाचे होते.

ताडकळस-पालम रस्त्यावरील धानोरा काळे गावाजवळ थार ( एमएच. २६ सीई ११६२) आणि कार ( एमएच. २२ ए.एम. ९६३२ ) या दोन वाहनांचा सोमवारी सकाळी समोरासमोर धडकून अपघात झाला. या अपघातात थार जीपमधील राहुल पवार आणि अभिजित राठोड हे दोघे मामा भाचे गंभीर जखमी झाले. इतर वाहनधारकांच्या मदतीने शेजारील शेतकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. त्यानंतर,  जखमींना ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. 

दरम्यान, या रुग्णालयात डॉक्टरांनी भाचा ॲड. अभिजीत रामदास राठोड (३२) यास तपासून मयत घोषित केले, तर राहुल आविनाश पवार (४१) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. मात्र, आज, उपचारादरम्यान मामा राहुल अविनाश पवार यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाने दिली.

सोमवारी मुखेड तालुक्यातील मंगळ तांडा येथे भाचा ॲड. अभिजीत राठोड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. तर मंगळवारी मामा राहुल पवार यांच्यावर कंधार तालुक्यातील रामा नाईक तांडा यांच्या मूळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकाने दिली. राहुल पवार हे माताेश्री सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ रामानाईक तांङा ता. कंधार संचलित, माध्यमिक आश्रम शाळा रामनगर ता. माजलगाव जि. बीड या संस्थेचे सचिव होते.

Web Title: bharadhaava-kaara-ana-thaaracai-samaoraasamaora-dhadaka-bhaisana-apaghaataata-maamaa-bhaacayaacaa-martayauu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.