वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:17 IST2025-06-10T20:17:11+5:302025-06-10T20:17:43+5:30

पूजन करताना लावलेल्या अगरबत्ती आणि धूपच्या धूराने झाडावरील मोहळ उठले

Bees attack women gathered for Banyan tree worship; chaos in Mahur | वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण

वटवृक्ष पूजनासाठी जमलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला; माहूरमध्ये गोंधळाचे वातावरण

- नितेश बनसोडे
माहूर :
वटवृक्षाचे पूजन करून प्रदक्षिणेसाठी जमलेल्या महिलांवर हजारो मधमाशांनी अचानकपणे हल्ला केल्याने शहरातील हनुमान मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना आज दि. १०, दुपारी ३ वाजता घडली असून यात एक महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी आहेत.

दरवर्षीप्रमाणे वार्ड क्रमांक पाच मधील हनुमान मंदिराजवळ वटवृक्षाचे पूजन आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी हजारो महिला येतात. सकाळी ११. २५ वाजेचा मुहूर्त असल्याने महिलांनी तोबा गर्दी केली होती. येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती धुप लावून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजन केले. 

दरम्यान, दुपारी तीन वाजता अगरबत्ती, धूपचा अर्पण करणे दुप्पट झाले. धूर जास्त झाल्याने शेजारील झाडावरील मोहळावरील मधमाशा उठल्या. अचानकपणे मधमाशांनी भाविक महिलांवर हल्ला चढवला. चंदा दिलीप पांडे ( वय 65 राहणार ब्राह्मण गल्ली) आणि रस्त्यावरून चाललेले विलास मोतीराम पवार ( 45 वर्षे राहणार बंजारा तांडा माहूर) यांच्यावर शेकडो मधमाशांनी हल्ला केल्याने दोघेही बेशुद्ध पडले. तर अनेक महिला जखमी झाल्या आहेत. मधमाशांनी हल्ला करताच महिलांनी तेथून पळ काढला. 

दरम्यान, बेशुद्ध पडलेल्या दोघांना उपचारांसाठी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील मधमाशांनी हल्ला केला. त्यांनी कसेबसे ग्रामीण रुग्णालय गाठले येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण वाघमारे यांनी जखमीवर उपचार केले.

Web Title: Bees attack women gathered for Banyan tree worship; chaos in Mahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.