शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मुखेड मतदारसंघात अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:33 AM

मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघ २००९ पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीपासून खुल्या प्रवार्गासाठी राखीव झाला़ येत्या २०१९ च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़

ठळक मुद्देउमेदवारीसाठी होणार रस्सीखेच वंचित फॅक्टरही ठरणार निर्णायक यापूर्वी काँग्रेसचेच होते वर्चस्व

दत्तात्रय कांबळे।मुखेड : मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघ २००९ पूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ २००९ च्या निवडणुकीपासून खुल्या प्रवार्गासाठी राखीव झाला़ येत्या २०१९ च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी बरीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे़२०१४ च्या निवडणुकीत प्रामुख्याने भाजपाचे डॉ. तुषार राठोड व कॉंग्रेसचे हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत डॉ.तुषार राठोड हे विजयी झाले. परंतु आगामी विधानसभेसाठी मुखेड - कंधार मतदारसंघातून भाजपाकडून आ. डॉ. तुषार राठोड यांच्यासह गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, धर्मभूषण मुख्याधिकारी रामदास पाटील, उद्योजक बालाजी पाटील कार्लेकर हे इच्छुक असून मागील महिन्यात त्यांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे़ माधवअण्णा साठे व व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनीसुद्धा पक्षातील बड्या नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या आहेत़या मतदारसंघात लिंगायत समाजाचे प्राबल्य असून रामदास पाटील हे त्यांनी पक्षातील दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत़ तेही प्रमुख दावेदार आहेत. सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांची ऊठबस आहे़ त्यामुळे राठोड यांच्या चिंतेत भर पडली आहे़ कॉग्रेसकडून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व शेषेराव चव्हाण यांची नावे पुढे आहेत.तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. व्यंकटराव सुभेदार किंवा ऐनवेळी दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता आहे़ तालुक्यात हटकर - धनगर व मागासवर्गीय एस.सी. समाजाची मतदानाची टक्केवारी पाहता वंचित आघाडी ही लोकसभेसारखीच विधानसभेमध्ये सुध्दा भाजपा-काँग्रेसची डोकेदुखी ठरणार हे मात्र निश्चित आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचे विजयी उमेदवार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर हे थोड्या फरकाने विजयी झाले तर अपक्ष उमेदवार मा.आ.कै.गोविंदराव मक्काजी राठोड हे पराभूत झाले होते.२०१४ च्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर डॉ़ तुषार राठोड हे विजयी झाले होते़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांत सहानुभूतीची लाट किती आहे़ यावरही राठोड यांचे भवितव्य अवलंबून आहे़असे जरी चित्र असले तरी सध्या मुखेड - कंधार मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी कॉग्रेसचे ४ , भाजपाचे ३, सेना १ व अपक्ष १ असे आहेत. तर मुखेड तालुक्यात भाजपा ३ व कॉग्रेस ३ व सेना १ असे ७ सदस्य असून भाजप कॉग्रेस ३-३ ने बरोबरीत आहेत. मुखेड तालुक्यातील पंचायत समितीमध्ये भाजपाचे ८ , कॉग्रेसचे ४ व सेनेचे २ आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १८ जागांपैकी १४ भाजपा व कॉग्रेस सेना युतीला ४ जागा आहेत. तर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष कॉग्रेसचे बाबूराव देबडवार असून नगरसेवक मात्र भाजपा-सेनेचे १२, काँग्रेस २, रासपा २, अपक्ष- १ भाजपाचे २ स्वीकृत सदस्य आहेत. यातही १९ पैकी १४ सदस्य हे भाजपाचे असल्यामुळे पक्षीय बलाबलमध्ये भाजपा पुढे आहे. तर पंचायत समिती व कृउबा समिती नगरपरिषदेत बहुमत व तालुक्यातील १२८ ग्रामपंचायतींपैकी जास्त ग्रामपंचायतीभाजपाच्या ताब्यात आहेत़ शिवसेनेचे आ़ सुभाष साबणे व हम पांचमधील माजी आ़ अविनाश घाटे, बळवंत पाटील बेटमोगरेकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, खुशाल पाटील उमरदरीकर हे विधानसभेला कोणाच्या मागे राहतील, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़ सध्यातरी मतदारसंघात अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :NandedनांदेडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र