शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे केळीच्या बागा करपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:22 IST

अर्धापूर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला असून त्याचा परिणाम केळीच्या बागावर दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़

ठळक मुद्देतापमानाचा पारा चढलेलाच वीजपुरवठ्यातही अनियमितता

पार्डी : अर्धापूर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला असून त्याचा परिणाम केळीच्या बागावर दिसून येत आहे़ वाढत्या तापमानामुळे केळीचे झाडे करपण्यास सुरुवात झाली़ तसेच उन्हाच्या तीव्रतेमुळे केळीची झाडे अर्ध्यातून मोडून बागांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत़मागील चार दिवसांपासून तापमान ४४ ते ४५ अंशापर्यंत गेल्याने केळीच्या बागांना तापमानाचा फटका बसला आहे़ त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित असल्याने आणि वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने विहीर व बोअरवरील वीजपंप चालत नाहीत. त्याचाही परिणाम केळीच्या बागावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे़ केळी पिकाला पाणी मिळत नसल्याने झाडे अर्ध्यातून मोडून पडत आहेत़ योग्य काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने केळीच्या झाडाचे वजन कमी भरत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ सध्या तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. मोठ्या मेहनतीने जोपासलेली केळी काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. गतवर्षी केळीचे मोठे नुकसान झाले होते. अनेक संकटांतून सावरलेल्या केळीच्या बागा मात्र उन्हाच्या तीव्रतेमुळे पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या असल्याचे दिसून येत आहे़

रमजान महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केळीला १२०० रुपये प्रतिक्विंटल भाव आहे़ परंतु तापमानामुळे केळीच्या बागाचे नुकसान होत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास तापमानामुळे हिरावून घेतला आहे - राजकुमार मदने, शेतकरी

पाण्याची कमतरता व तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी केळीच्या बागेस रात्रीच्या वेळी जमेल तेवढे पाणी द्यावे, जेणेकरून जमिनीचा ओलावा राहील आणि केळीला संतावा बसणार नाही. रात्रीच्या वेळी दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही, याची शेतक-यांनी काळजी घ्यावी - बी. बी.गाजेवाड, कृषी सहायक अधिकारी, अर्धापूर

टॅग्स :NandedनांदेडTemperatureतापमान