चालकाचा ताबा सुटल्याने ऑटोरिक्षा उलटला; वृध्द महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:37 IST2019-08-20T16:34:40+5:302019-08-20T16:37:49+5:30
अपघातात एकजण गंभीर जखमी आहे

चालकाचा ताबा सुटल्याने ऑटोरिक्षा उलटला; वृध्द महिला ठार
भोकर (नांदेड) : येथील उमरी रस्त्यावरील रायखोड शिवारात ऑटोरिक्षा उलटून झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. यात एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी (दि.१९ ) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली.
उमरी येथून भोकरकडे प्रवासी घेवून येणारा ऑटोरिक्षा (क्र. एम.एच.२६ एसी २७०) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटला. अपघातात जखमी प्रवाशांना भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान ७० वर्षीय वृद्ध महिला गजाबाई माधवराव अहिले (रा. रापतवारनगर, उमरी) यांचा मृत्यू झाला, तसेच परसराम जळबा देशमुखे (रा. चोरंबा ता. हदगाव) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात रवाना केले आहे.