शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले थांबवावेत, ठाकरे सरकार अपयशी'

By महेश गलांडे | Updated: March 2, 2021 16:48 IST

येथील संदीप दुधमल हे शेतातून साइकलवर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकलवरुन घरी येताना त्यांनी संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला.

ठळक मुद्देयेथील संदीप दुधमल हे शेतातून साइकलवर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकलवरुन घरी येताना त्यांनी संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला.

नांदेड - जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील शिवनी गावात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याला गंभीर स्वरुप मिळाल्याने हा बौद्ध समाजातील कुटुंबावर हल्ला असल्याचे सांगत, 23 फेब्रुवारी रोजी लोहा शहरात बंद पुकारण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले होते. त्यानंतर, अनेक आंबेडकरवादी नेत्यांना या गावाला भेट दिली. केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही गावाला भेट देऊन पीडित कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यानंतर, महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला. 

येथील संदीप दुधमल हे शेतातून साइकलवर घरी येताना रस्त्यात गावातीलच दोघे मोटारसायकलवरुन घरी येताना त्यांनी संदीप दुधमलच्या सायकलला धडक मारली. त्यानंतर संदीपने त्यांच्याशी वाद घातला. त्यावेळी दोघांनी जातीय शिवीगाळ करून संदीपला मारहाण केली. एवढ्यावर न थांबता आरोपींनी संदीप दुधमलच्या घरी जाऊन आई, भाऊ,वडील, चुलता, चुलती, बहीण यांना घरात घुसून मारहाण केली. ही मारहाण सुरू असतानाच हे भांडण सोडवायला गेलेल्या गणेश येडकेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खाली पाडण्यात आले. या घटनेनंतर गावात तणाव पसरला होता. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे फौजफाट्यासह गावात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दोन्ही बाजूकडील मंडळींना शांततेच आवाहन केले. तसेच फरार असलेल्या इतर आरोपींच्या शोधासाठी पथके पाठविली आहेत. आज, रामदास आठवले यांनीही पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. ''नांदेड मधील लोहा तालुक्यातील शिवनी जामगा या गावात  बौद्ध कुटुंबावर झालेल्या सामूहिक हल्ल्या प्रकरणी आज घटनास्थळी भेट देऊन पीडितांची भेट घेतली. महाराष्ट्रात दलितांवर वाढत असलेले हल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी थांबवावेत. त्यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार दलितांवरील हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे.'', असे आठवले यांनी म्हटले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेDalit assaultदलितांना मारहाणNandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस