लाखोंची रोकड असलेली एटीएम मिशन चोरट्यांनी केली लंपास; लोहा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:00 IST2025-05-28T13:59:21+5:302025-05-28T14:00:09+5:30
पत्राच्या शेडमध्ये थाटले होते एटीएम मशीन

लाखोंची रोकड असलेली एटीएम मिशन चोरट्यांनी केली लंपास; लोहा येथील घटना
- गोविंद कदम
लोहा ( नांदेड) : शहरातील सर्वात गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पत्राच्या शेडमध्ये थाटलेल्या इंडिया बँकेचे एटीएम पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लंपास केले. मशीनमध्ये ३ लाख रुपये असल्याचे खाजगी एटीएम कंपनीच्या वतीने पोलिसांना सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, लोह्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या पथकाने पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट पथकास पाचारण करण्यात आले होते. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून तपास सुरू आहे.