निवघा रोडवर पुन्हा अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 14:37 IST2023-04-01T14:36:46+5:302023-04-01T14:37:38+5:30
टेम्पो आणि दुचाकीची समोरसमोर धडक झाली; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

निवघा रोडवर पुन्हा अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
- संदीप तुपकरी
हदगाव: नांदेड- नागपूर महामार्ग पार करून जावे लागत असल्याने निवघा रोडवर कायम अपघात होत आहेत. आज सकाळी ८ वाजता टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. काशिनाथ मारुती सूर्यवंशी (५६, रा. माहाताळ ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, माहाताळ येथील काशिनाथ सूर्यवंशी दुचाकीवरून मानवाडी येथे जात होते. यावेळी निवघा जाणाऱ्या रोडवर द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात काशिनाथ सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्यांना नांदेड येथे रवाना केले. येथेच उपचार सुरु असताना काशिनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.
सातत्याने होत आहेत अपघात
निवघा रोडवर नांदेड-नागपूर महामार्ग पार करून यावं लागते. यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. यात अनेकांनी जीव गमावले, अनेक कायमचे अधू झाले आहेत. यामुळे येथे पुलाची उभारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.