संतापजनक ! अनाथ आश्रमातील अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 11:30 IST2021-02-28T11:25:56+5:302021-02-28T11:30:26+5:30

Rape on Minor girl of Anath Ashram दोन मुलींनी आश्रमातून पलायन केल्यानंतर घटना उघडकीस

Annoying! Director of the Anath Ashram School from mudkhed rapes on a minor girl | संतापजनक ! अनाथ आश्रमातील अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकाचा अत्याचार

संतापजनक ! अनाथ आश्रमातील अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकाचा अत्याचार

ठळक मुद्देमुदखेड येथील अनाथ आश्रमातून शुक्रवारी रात्री 14 आणि 16 वर्षीय दोन मुलींनी पलायन केले होते. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असता, 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले

नांदेड: मुदखेड येथील अनाथ आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर संचालकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणात संस्थाचालक शिवाजी गुट्टे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुदखेड येथील अनाथ आश्रमातून शुक्रवारी रात्री 14 आणि 16 वर्षीय दोन मुलींनी पलायन केले होते. त्यानंतर रेल्वेने या दोन्ही मुली शनिवारी पहाटे किनवट रेल्वे स्टेशन येथे पोहचल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. त्यांनी या दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आश्रमात मारहाण होत असल्याने पळल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी लगेच ही माहिती मुदखेड पोलिसांनी दिली. 

मुदखेड पोलिसांनी शनिवारी रात्री किनवट येथून त्यांना मुदखेड ला आणले. या ठिकाणी दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असता, 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांनी संस्थाचालक शिवाजी गुट्टे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयाची माहीती मिळताच गुट्टे फरार झाला होता. परंतु पोलिसांनी काही तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान या मुलीवर अनेक वेळा अत्याचार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Annoying! Director of the Anath Ashram School from mudkhed rapes on a minor girl