शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

शेतातील विद्युत कुंपणाने घात केला; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:41 IST

रानडुक्करांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला कुंपण घालून त्यात विद्युत प्रवास सोडण्यात आला होता 

- दत्तात्रय कांबळेमुखेड ( नांदेड) : मुखेड तालुक्यातिल सकनुर येथील एका शेतकऱ्यांने रानडुक्करांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला तारेचे कुंपण घालून त्यात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. हे तारेचे कुंपण चार तरुणाच्या जीवावर बेतले असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे तरुण गंभीर जखमी आहेत. चौघेही सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या दरम्यान मासे, खेकडे पकडण्यासाठी नदीवर जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

तालुक्यातिल कुंद्राळा येथील शेतमालक सूर्यकांत  पाटील कुंद्राळकर यांची शेती सकनुर शिवारात तलावाच्या जवळ आहे. सकनुर येथील मोहन जाधव  हा शेती कसतो. पिकांचे रानडुकर, हरीण नुकसान करत असल्याने त्यांनी शेतास तारेचे कुंपण लावले असून त्यात रात्री विद्युत प्रवाह सोडला जातो. दरम्यान, सोमवारी रात्री गावातील संभाजी पुंडलिक नागरवाड (२१), शिवाजी रामदास सुरूमवाड ( २०), संजय मारुती नागरवाड ( २२ ), विजय संभाजी हंबीरे ( २२ ) हे चौघेजण मासे, खेकडे पकडण्यासाठी तलावाखालील नदीवर जात होते. तलावापासून जात असताना शेताच्या बांधाजवळ लावलेल्या विद्युत कुंपणाचा स्पर्श संभाजी याच्या पायास झाला,  त्यापाठोपाठ शिवाजी याचा देखील तारेस स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का बसला. यावेळी शिवाजीचा हात विजय व संजय या दोघांना लागला. मात्र, विजय व संजय बाजूला फेकले गेले. तर तारेस चिटकून बसल्याने संभाजी व शिवाजी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

संजय आणि विजय यांच्यावर मुखेड येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वार गायकवाड यांनी दिली. माहिती मिळताच मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भालचंद्र तिडके, पोलिस उप निरीक्षक गजानन काळे, पोलिस उप निरीक्षक विशाल सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडDeathमृत्यू