शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सोडतीद्वारे करावे लागले बियाणे वाटप; बियाणांच्या तुटवड्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 19:42 IST

बियाणांसाठी शेतकऱ्यांची रीघ

ठळक मुद्देकृषी विभागाचा ढिसाळ कारभारबारूळ येथे सोडतीद्वारे बियाणे वाटप 

बारुळ (जि. नांदेड) : खरीप हातचा गेल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता रबी हंगामावर आहेत. मात्र शेतकऱ्यांमागच्या अडचणी संपायला तयार नाहीत. कृषी विभागाच्या वतीने रबी हंगामासाठी बियाणे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शेकडो शेतकरी बारुळच्या कृषी मंडळ कार्यालयात जमा झाले. मात्र अवघ्या ३५ हरभरा बियाणाच्या बॅगा आल्याने अनेक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

कृषी विभागाच्या वतीने कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला जातो. याअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दरवर्षी हंगामनिहाय विविध उपक्रम हाती घेतले जातात. यंदा या अभियानाअंतर्गत रब्बी हंगामात कडधान्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. बारूळ कृषी मंडळ कार्यालयातंर्गत ३३ गावे येतात. त्यापैकी तीन गावासाठी ३० हेक्टरसाठी पुरेल इतके हरभऱ्याचे बियाणे प्राप्त झाले होते. यातील बारूळ, भूकमारी व गुंडा या गावासाठी कृषी सहायकांच्या उपस्थितीत  बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बारूळ शिवारातील ३२० शेतकऱ्यांनी हरभरा बियाणाचे मागणीसंदर्भात नावे नोंदवली होती. परंतु प्राप्त झालेल्या बॅगा अवघ्या ३५ असल्याने या बॅगा नेमक्या द्यायच्या कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला. या विषयावरुन काहीकाळ कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर लक्की ड्रॉ काढून या बॅगांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु बारूळ शिवारातील एका कुटुंबाच्या घरी एकच नाव नोंदणी करण्याची अट असल्याने अनेक शेतकऱ्यांना बियाणापासून वंचित रहावे लागले. यातून गदारोळ  वाढल्याने कृषी सहायक गोविंद तोटेवाड हे बियणांचे वाटप न करताच निघून गेले. 

नव्या नियमामुळे शेतकरी बियाणापासून वंचितकृषी विभागाकडून मागील काही वर्षे नियमानुसार १०० हेक्टर शेतीच्या बियाण्याचे वाटप केले जात होते. ते आता नव्या नियमानुसार १० हेक्टर शेतीसाठी वाटप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अनेक गरजू शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही बियाणाचे वाटप करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने कृषी विभागाने बियाणे वाटपा संदर्भातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.  

२०० हेक्टरवर लागवड; १० हेक्टरपुरते बियाणेबारूळ शिवारात रबी हंगामात साधारण २०० हेक्टर हरभऱ्याची लागवड होते. परंतु कृषी विभागाच्या नवीन नियमानुसार या शिवारातील केवळ दहा हेक्टर साठी बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दहा हेक्टरसाठी बियाणाच्या अवघ्या ३५ बॅगा आल्याने बारूळ कृषी मंडळ कार्यालयातील ३३ गावातील शेकडो शेतकऱ्यांना याचे वाटप कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला.  या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र