शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’नंतर आता शक्तिपीठ महामार्ग, गडकरींनी केली होती घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 10:56 IST

राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे.

गोकुळ भवरे -

किनवट (जि. नांदेड) : राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून, या महामार्गाने किनवट तालुका देशाच्या नकाशावर येणार आहे.    राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. माहूर, औंढा नागनाथ, अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर या प्रमुख धार्मिक स्थळांना तो जोडला जाणार आहे. हा प्रस्तावित एक्स्प्रेस वे श्रीक्षेत्र माहूर येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए ला जोडला जाणार आहे. 

या महामार्गाच्या जमीन संपादनासाठी सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. हा महामार्ग श्रीक्षेत्र माहूरला जोडल्यानंतर सारखणी, मांडवी, पिंपळगाव, आदिलाबाद या आंतरराज्य रस्त्यांचे महत्त्व वाढणार आहे. 

शिवाय भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर (क्र. ४४) या मार्गाला जोडला जाणार असल्याने किनवट तालुक्याचे महत्त्व वाढणार आहे.   

गडकरींनी केली होती घोषणामाहूर येथे २३ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनावेळी तत्कालीन आमदार प्रदीप नाईक यांनी सारखणी-मांडवी-आदिलाबाद या ४५ किमीच्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली होती. तर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दर्जा दिल्याची घोषणा केली होती.

झपाट्याने वाढेल पर्यटनकिनवट तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील टिपेश्वर आणि तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील कावल व्याघ्र रिझर्व्हमधून किनवटच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन वाढणार असून, तालुक्याच्या महसुलातही वाढ होईल.

टॅग्स :Shakti Peethasशक्तिपीठSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गhighwayमहामार्ग