शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

पाटील नंतर चव्हाण माय-लेकींना नांदेड जिल्ह्याने केले आमदार; श्रीजया यांनी केलं संधीचे सोनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:56 IST

नांदेड जिल्ह्यात माय-लेकींना आमदार करणाऱ्या हदगाव व भोकर या दोन मतदारसंघांची वेगळी ओळख राज्यात निर्माण झाली आहे.

नांदेड : भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून निवडणूक जिंकत नांदेड जिल्ह्यात पाचव्या महिला आमदार बनण्याचा बहुमान प्राप्त केला. माय-लेकींना आमदार करणाऱ्या नांदेड जिल्ह्यात श्रीजया यांच्या विजयाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

श्रीजया चव्हाण यांच्यापूर्वी जिल्ह्यात चार महिला आमदार झाल्या. यापूर्वी हदगाव मतदारसंघातून माय-लेकींनी विधानसभेचे नेतृत्व केले होते. अमिता चव्हाण यांच्यानंतर भोकरवासीयांनी श्रीजया यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात माय-लेकींना आमदार करणाऱ्या हदगाव व भोकर या दोन मतदारसंघांची वेगळी ओळख राज्यात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, २०२४ विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात त्या एकमेव महिला आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणार आहेत.

खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या श्रीजयाने यंदा चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक असलेल्या भोकर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविली. काँग्रेसचे तिरुपती कोंढेकर यांचा त्यांनी दारुण पराभव केला. माय-लेकीला आमदार करणाऱ्या हदगाव मतदारसंघाची यापूर्वी राज्यात ओळख होती. माय-लेकींना आमदार बनविणारा बहुधा हा राज्यातील एकमेव मतदारसंघ होता. त्याचीच पुनरावृत्ती २०२४मध्ये भोकर मतदारसंघात झाली. नांदेड जिल्ह्यातून संयुक्त महाराष्ट्र असताना अंजनाबाई जयवंत पाटील यांनी जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार बनण्याचा मान प्राप्त केला होता. संयुक्त महाराष्ट्रात १९५७ ते १९६२ या काळात अंजनाबाई या पहिल्या महिला आमदार बनल्या. मातब्बर नेते श्यामराव बोधनकर यांचा त्यांनी १९५७ मध्ये पराभव केला होता.

सूर्यकांता पाटील यांनी केले प्रतिनिधित्वतब्बल १८ वर्षांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९८०मध्ये अंजनाबाई यांची मुलगी सूर्यकांता पाटील या हदगावमधून निवडून आल्या होत्या. अत्यंत चुरशीच्या या लढतीत सूर्यकांता पाटील यांनी अवघ्या ५१७ मतांच्या फरकाने बापूराव पाटील शिंदे यांचा पराभव केला होता.

श्रीजया पाचव्या आमदारअंजनाबाई व सूर्यकांता या माय-लेकींनंतर शिवसेनेच्या अनुसया खेडकर या २००४मध्ये नांदेड उत्तरमधून निवडून आल्या होत्या. २०१४मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघात अमिता चव्हाण यांनी माजी राज्यमंत्री माधव पाटील - किन्हाळकर यांचा पराभव केला होता. २०२४मध्ये श्रीजयाने भोकरमधून विजय प्राप्त करत पाचव्या महिला आमदार बनण्याचा बहुमान मिळविला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024bhokar-acभोकरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाण