फालतू गोष्टींवर काय बोलायचं?; निलेश राणेंच्या आरोपावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:05 IST2019-01-15T18:51:38+5:302019-01-15T20:05:05+5:30

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या ३ दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

Aditya Thackeray avoided speaking about Nilesh Rane's accusations | फालतू गोष्टींवर काय बोलायचं?; निलेश राणेंच्या आरोपावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

फालतू गोष्टींवर काय बोलायचं?; निलेश राणेंच्या आरोपावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

नांदेड : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर दौऱ्यावर आहेत. यावेळी हदगाव येथे निलेश राणे यांनी केलेल्या आरोपावर विचारले असता 'जाऊ द्या हो या गोष्टींमध्ये काय' अशी प्रतिक्रिया देत त्यांनी काढता पाय घेतला. 

आदित्य ठाकरे हे सध्या ३ दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातून या दौऱ्याची सुरुवात झाली.  नवरदेववाडी आणि वरवट या गावांना त्यांनी धावती भेट घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी काही शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते पशुखाद्य वाटप करण्यात आले. 

यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करतांना शासन जिथे कमी पडते अशा भागात एक पक्ष म्हणून आम्ही मदत देत आहोत. मला शेतीमधील जास्त माहिती नाही मात्र शेतकऱ्यांना आवश्यकता असेल तेव्हा शिवसेना मदतीसाठी धावून येईल असे सांगितले. दरम्यान, निलेश राणे यांनी केलेल्या आरोपावर विचारले असता 'जाऊ द्या हो या गोष्टींमध्ये काय' अशी प्रतिक्रिया देत त्यांनी काढता पाय घेतला. 

Web Title: Aditya Thackeray avoided speaking about Nilesh Rane's accusations