शौचालयाच्या खिडकीतून आरोपीने ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:40 IST2019-03-02T00:39:50+5:302019-03-02T00:40:38+5:30
शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी दुपारी ठाण्यातील शौचालयात गेला होता़ यावेळी शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून बाहेर पडत त्याने धूम ठोकली़ त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत़

शौचालयाच्या खिडकीतून आरोपीने ठोकली धूम
नांदेड : शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी दुपारी ठाण्यातील शौचालयात गेला होता़ यावेळी शौचालयाच्या पाठीमागील खिडकीतून बाहेर पडत त्याने धूम ठोकली़ त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत़
शेख मोहम्मद मुजाहिद शेख मोहम्मद हाजी (वय २०, रा़साईनगर, इतवारा) असे आरोपीचे नाव आहे़ हा सराईत चोरटा असून घरफोडीच्या गुन्ह्यात इतवारा पोलिसांनी त्याला पकडले होते़ शुक्रवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास त्याने ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला शौचास जायचे आहे असे सांगितले़ त्यानंतर कर्मचारी त्याला ठाण्यातील शौचालयाकडे घेवून गेला़ त्यानंतर पोलीस कर्मचारी शौचालयाबाहेर पहारा देत होते़ त्याचवेळी आरोपी शेख मोहम्मद मुजाहिद याने शौचालयाच्या पाठीमागील खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर उडी घेत पळ काढला़ बराचवेळ आरोपी शौचालयातून बाहेर न आल्यामुळे पहारा देणाऱ्या पोलिसांना संशय आला़
त्यांनी लगेच शौचालयाची तपासणी केली असता, आरोपीने आपल्या हातावर तुरी दिल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात घेता़ लगेच ही बाब वरिष्ठांना कळविली़ त्यानंतर ठाण्यात एकच धावपळ उडाली़ पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी आता पथके रवाना केली आहेत़ दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ आरोपीने पांढºया रंगाचा शर्ट व गडद रंगाची पॅन्ट घातली आहे़ पाच फूट उंचीच्या या आरोपीला नशा करण्याची सवय आहे़