जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक

By शिवराज बिचेवार | Updated: September 5, 2022 16:57 IST2022-09-05T16:57:07+5:302022-09-05T16:57:31+5:30

जुन्या भांडणाच्या कारणावरून काही जणांनी एका युवकाला मारहाण करून खंजरने भोसकले.

Accused arrested from Nizamabad in case of murder of youth due to old quarrel | जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक

जुन्या भांडणातून युवकाचा खून प्रकरणात आरोपीला निझामाबादेतून अटक

नांदेड: शहरातील गणेशनगर वाय पॉईंट परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात फरार असलेल्या आराेपीला शिवाजीनगर पोलिसांनी निझामाबाद जिल्ह्यातून पकडून आणले. ही कारवाई रविवारी करण्यात आली. 

गणेशनगर वाय पॉईंट येथे २४ ऑगस्ट रोजी अनिकेत उर्फ सोनू सुरेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून विक्की सुखदेव पोटभरे याला मारहाण केली होती. यावेळी गायकवाड याने खंजरने वार करून पोटभरे याला जखमी केले होते. उपचारादरम्यान पोटभरेचा मृत्यू झाला. परंतु घटनेनंतर अनिकेत गायकवाड हा फरार झाला होता. 

शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाेध पथकाचे सपोनि रवि वाहूळे, पोउपनि मिलिंद सोनकांबळे, पोउपनि रोडे, शेख इब्राहिम, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे यांच्या पथकाला आरोपी गायकवाड हा निझामाबाद जिल्ह्यातील आरमूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पथकाने त्याठिकाणी धाड टाकून गायकवाडला बेड्या ठोकल्या.

Web Title: Accused arrested from Nizamabad in case of murder of youth due to old quarrel