Accident: टिप्परच्या धडकेत सायकल स्वार शाळकरी मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 19:23 IST2021-07-03T19:22:08+5:302021-07-03T19:23:33+5:30
Accident: एक शाळकरी मुलगा शालेय साहित्य घेऊन सायकलवर घराकडे जात असताना समोरून भरधाव वेगात असलेल्या टिप्परने जोराची धडक दिल्याने त्या धडकेत सायकल स्वार मुलाचा जागीच मृत्यू झाला.

Accident: टिप्परच्या धडकेत सायकल स्वार शाळकरी मुलाचा मृत्यू
नांदेड ÷ एक शाळकरी मुलगा शालेय साहित्य घेऊन सायकलवर घराकडे जात असताना समोरून भरधाव वेगात असलेल्या टिप्परने जोराची धडक दिल्याने त्या धडकेत सायकल स्वार मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. 3 जुलै रोजी दुपारी तीन वाजता शहरातील संतोष बार जवळ घडली.
तालुक्यातील हंगरगा येथील हल्ली मुक्काम देगलूर येथील रहिवासी ओमप्रकाश रघुपेरवार हंगरगेकर यांचा 14 वर्षीय मुलगा समर्थ ओमप्रकाश रघुपेरवार हा दि.3 जून रोजी दुपारी शालेय साहित्य खरेदी करून बाजारातून घराकडे सायकलवर जात असताना संतोष बार जवळ असलेल्या बावलगावकर देसाई यांच्या घरासमोर पुढून येत असलेल्या एका भरधाव टिप्परने ( क्रमांक नसलेल्या )त्या सायकलस्वरास जोराची धडक दिली. या धडकेत समर्थ याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल होऊन मयत मुलाचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनास्थळावरून टिप्पर चालक व टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .पुढील तपास पोलीस करीत आहेत . समर्थ रघुपेरवार हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने शहर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.