एसीबी महिला निरीक्षकच सापडल्या लाचखोरीत, पतीलाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 08:00 IST2022-11-29T08:00:12+5:302022-11-29T08:00:44+5:30
मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव असून, त्यांच्या पतीलाही अटक केली आहे.

एसीबी महिला निरीक्षकच सापडल्या लाचखोरीत, पतीलाही अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : लाचखोरीला पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातच लाच घेतली जात असल्याचे उदाहरण नांदेडात समोर आले आहे. तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थांमार्फत लाचेची मागणी करणाऱ्या महिला पोलिस निरीक्षकाला एसीबीनेच पकडले आहे.
मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव असून, त्यांच्या पतीलाही अटक केली आहे. या दोघांचीही रवानगी कोठडीत करण्यात आली. बकाल यांनी मध्यस्थाकडून या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे.