लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील देगलूर नाका परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या आॅनलाईन जुगार अड्ड्यावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने धाड टाकून १८ जणांना अटक केली़ तर १ लाख ६६ हजार रूपयांचे संगणक, स्कॅनर, प्रिंटर आदी साहित्य जप्त केले़देगलूर नाका परिसरात महाराष्ट्र शासनाची कोणताही परवानगी नसताना व शासनाचा महसूल बुडवून मान्यताप्राप्त लॉटरी सेंटरच्या नावाखाली साई लक्की कुपन नावाच्या माध्यमातून आॅनलाईन जुगार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांना केली़देगलूर नाका परिसरात सपोनि चिंचोलकर व सुरेश वाघमारे, पिराजी गायकवाड, शंकर केंद्रे, संजय पांढरे, समीर शेख, बालाजी मुंडे यांनी धाड टाकून १८ जणांना अटक केली़ यानंतर जुगार कायद्यान्वये (१२ अ) संबंधित अठरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईत विविध कंपन्यांचे तीन कॉम्प्युटर, तीन मॉनिटर, तीन सीपीयू, तीन की-बोर्ड, तीन स्कॅनर, तीन प्रिंटर, तीन डोंगल व इतर इलेक्ट्रॉनिक जुगार साहित्य व रोख रक्कम व चिठ्ठ्या असा एकूण १ लाख ६६ हजार २२० रुपयांचे साहित्य जप्त केले़ आॅनलाईन पद्धतीने खुलेआम जुगार चालविणाºयांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे़
आॅनलाईन जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:26 IST
शहरातील देगलूर नाका परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या आॅनलाईन जुगार अड्ड्यावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने धाड टाकून १८ जणांना अटक केली़ तर १ लाख ६६ हजार रूपयांचे संगणक, स्कॅनर, प्रिंटर आदी साहित्य जप्त केले़
आॅनलाईन जुगार अड्ड्यावर धाड
ठळक मुद्देस्थागुशाची कारवाई : १८ जणांवर गुन्हा; दीड लाखांचे साहित्य जप्त