शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

आधार क्रमांक एकाचा, तर पासबुक दुसऱ्याचे! नांदेडमध्ये लाडक्या बहिणींच्या पैशाचा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:06 IST

सीएससी केंद्र चालकांनी ओळखीच्या लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची कागदपत्रे वापरून शंभरहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे हडप केले.

हदगाव (जि. नांदेड) : आधार कार्डावर खाडाखोड करून लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा केल्याप्रकरणी प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचे दुसऱ्या दिवशी आढळून आले. मनाठा येथील सीएससी केंद्र चालक सचिन भुजंग थोरात व सुनील भुजंग थोरात या दोन बंधूंनी ओळखीच्या लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची कागदपत्रे वापरून शंभरहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे हडप केले. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

मनाठा येथील नंदणी चंदण चव्हाण या युवतीची कागदपत्रे वापरली व अलीम कादरी यांचे आधार व बँक पासबुक वापरले. त्यामुळे दोघांच्याही खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झाले. सचिन थोरात व सुनील थोरात या दोघांनी गावातील ओळखीच्या युवकांना गोड बोलून रोजगार हमी विहिरीचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार, असे सांगून आधार कार्ड व बँक पासबुक जमा केले. गावातील ४६ लोकांनी त्यांच्याकडे कागदपत्रे जमा केली. लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता शासनाने २८ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला. सचिन थोरात याने युवकांची कागदपत्रे घेतली. त्या युवकांना दोनशे रुपये खर्च म्हणून दिले.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी केली चौकशी‘लोकमत’ने आज लाडकी बहीण योजनेतील घोळ उघड केल्यानंतर सोमवारी भल्या पहाटे तलाठी व मंडळ अधिकारी गावात आले. त्यांनी १६ लोकांचे जबाब घेतले. विहिरीचे पैसे येणार आहेत, असे सांगून कागदपत्रे घेतल्याचे सर्व नागरिकांनी जबाबात सांगितले. दरम्यान, तहसीलदारांनी गावाला भेट दिली नाही. सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही. या घोटाळ्यामुळे आजूबाजूच्या गावांतील महिलाही सतर्क झाल्या आहेत.

टॅग्स :Nandedनांदेडladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाCrime Newsगुन्हेगारी