व्यायामाला गेलेल्या तरुणास दुचाकीने उडवले; उपचारादरम्यान झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 20:00 IST2023-09-13T20:00:05+5:302023-09-13T20:00:15+5:30
एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

व्यायामाला गेलेल्या तरुणास दुचाकीने उडवले; उपचारादरम्यान झाला मृत्यू
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : सकाळी व्यायामाला गेलेल्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी यमशेटवाडी येथे घडली. व्यंकटेश उकाजी कंकाळ ( १८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
व्यंकटेश कंकाळ आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडला. खडकुत ते यमशेटवाडी रोडवरून जात असताना त्याला भरधाव दुचाकीने उडवले. यात व्यंकटेश गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यास नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान व्यंकटेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कुटुंबातील एकुलता एक
व्यंकटेशच्या पश्चात आजी - अजोबा, आई-वडील, एक बहीण, काका-काकू असा मोठा परिवार आहे. चुलते दत्ता कंकाळ यांना चार मुली आहेत. दोन्ही कुटुंबात एकच मुलगा असल्याने व्यंकटेश सर्वांचा लाडका होता. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.