भरधाव पीकअप जीपची स्कूलव्हॅनला समोरून धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:15 IST2025-02-08T14:14:08+5:302025-02-08T14:15:05+5:30

स्कूलव्हॅन चालकासह आठ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला हलवले

A speeding pickup jeep hits a school van head-on; 11 students including the driver are injured | भरधाव पीकअप जीपची स्कूलव्हॅनला समोरून धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

भरधाव पीकअप जीपची स्कूलव्हॅनला समोरून धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड) :
शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जाणाऱ्या स्कूल व्हॅनला भरधाव येणाऱ्या पिकअप जीपने समोरासमोर धडक दिली यात चालक गंभीर जखमी झाला आहे. तर अन्य अकरा विद्यार्थी जखमी झाले असून काहींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर घटना आज शनिवार रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास तामसा रोडवरील नरहरी मंगल कार्यालयाजवळ घडली.

अर्धापूर ते तामसा रोडवर भरधाव वेगात येणाऱ्या लोडिंग पिकअप जीप ( क्र.(एम.एच ४० सी.एम ८२६५) ची शाळेतील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कूलव्हॅनला (एम.एच २६ बी.ई ०७८७) समोरासमोर जोरदार धडक दिली. यात स्कूलव्हॕन चालक मनोज चंद्रकांत रणवीर ( २९ रा. लहान ता.अर्धापूर) याच्यासह अकरा विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर पीकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला. 

अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे,१०८ चे डॉ. आनंद शिंदे,चालक मारोती गिरी, १०२ चे संतोष कांबळे यांनी जखमी विद्यार्थ्यांना अर्धापूर व नांदेड येथे रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नेले. यावेळी अधिक्षक विद्या झिने, डॉ. महम्मद शाहीन, डॉ.युवराज दाढाळे सह खाजगी डॉक्टरही यावेळी मदतीला धावले होते. दरम्यान, चालक मनोज रणवीर गंभीर जखमी असून त्याच्यासह ८ विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे प्रमाणे: 
युवराज अमोल बारसे, संजय जगदीश पहाडे, समर्थ अमोल जाधव, गौरव गजानन वाघमारे, प्राची प्रसाद भोजे, सिद्धीका आनंद भुस्से, मयूर मारोती क्षिरसागर, विशाल वीरभद्र भुस्से, युवराज अवधूत शिंदे, वैष्णवी गजानन भोकरे, सदाशिव गणेश क्षीरसागर ही विद्यार्थ्यांची नावे डॉक्टरांकडून मिळाली आहेत. 

Web Title: A speeding pickup jeep hits a school van head-on; 11 students including the driver are injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.