दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास

By शिवराज बिचेवार | Updated: January 24, 2023 15:53 IST2023-01-24T15:52:03+5:302023-01-24T15:53:49+5:30

एका सीसीटीव्ही मध्ये 3 दरोडेखोर अस्पष्ट दिसत असून या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

A flurry of robbers in Deglur; 4 lakh worth of jewelry looted after killing an old woman | दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास

दरोडेखोरांचा धुमाकूळ; वृद्ध महिलेची हत्याकरून 4 लाखांचा मुद्देमाल लंपास

नांदेड- देगलूर शहरातील शास्त्रीनगर येथील एका घरात अज्ञात 3 दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास दरोडा टाकून 65 वर्षीय चंद्रकलाबाई यांची हत्या करत सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. 

शास्त्रीनगर येथे वृद्ध पाटील दांपत्य राहते. सोमवारी रात्री वृद्ध दाम्पत्य घरात झोपले होते. दरम्यान, आज पाहटे तीन दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दोघांचेही हात पाय बांधून दरोडेखोरांनी मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकलाबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील 12 तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे वाळे असा चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना देगलूरमधील भरवस्तीत घडल्याने देगलूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका सीसीटीव्ही मध्ये 3 दरोडेखोर अस्पष्ट दिसत असून या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
 

Web Title: A flurry of robbers in Deglur; 4 lakh worth of jewelry looted after killing an old woman