नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 18:37 IST2022-11-15T18:37:11+5:302022-11-15T18:37:29+5:30
कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकऱ्याने संपवले जीवन

नापिकीमुळे शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
नांदेड: शेतातील नापिकीमुळे राहत्या घरात गळफास घेऊन एका ३५ वर्षीय तरूण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना नांदेड तालुक्यातील मार्कंड येथे १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. गोविंद मारोती येवले (रा. मार्कंड ता. जि. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
नांदेड तालुक्यातील मार्कंड येथील तरूण शेतकरी गोविंद मारोती येवले याच्या शेतात नापिकीने उत्पन्न कमी झाले. परिणामी लोकांकडून घेतलेले पैसे कसे फेडावेत या विवंचनेत गोविंद येवले होता. याच तणावातून अखेर १३ नोव्हेंबर रोजी रात्री गोविंद याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान मारोती रामा येवले (रा. मार्कंड) यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस अंमलदार जुबेर चाऊस यांनी दिली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार माधव गवळी हे याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.