शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकी पेशाला काळिमा! दारू पिऊन शाळेत शिक्षकाचा धिंगाणा; विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:46 IST

'धक्कादायक' Video व्हायरल, ज्या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शिक्षण मिळायला हवे, त्याच शाळेत शिक्षकाकडून असे गैरवर्तन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- नितेश बनसोडेमाहूर (नांदेड): 'गुरु'ला देवाचे स्थान देणाऱ्या महाराष्ट्रात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार माहूर तालुक्यातील शेकापूर येथे उघडकीस आला आहे. मौजे शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारूच्या नशेत चक्क शाळेतच धिंगाणा घातला. मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसोबत अश्लील भाषेत बोलताना आणि विचित्र डान्स करतानाचा त्यांचा धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

शिक्षकाच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतव्हायरल झालेला हा व्हिडिओ शुक्रवार (दि. ५) चा असल्याचे सांगितले जात आहे. शिक्षक अनंत वर्मा हे नेहमीप्रमाणे शाळेत दारूच्या नशेत आले होते. वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी ते त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत होते. इतकेच नाही तर ते अधूनमधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात होते आणि विचित्र हातवारे व डान्स करत होते. हा सर्व प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून, शिक्षकाच्या अशा विकृत वागण्यामुळे विद्यार्थी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरज्या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शिक्षण मिळायला हवे, त्याच शाळेत शिक्षकाकडून असे गैरवर्तन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वास्थ्य बिघडविण्यासोबतच त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या या शिक्षकावर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षण विभागाने तातडीने शिक्षक अनंत वर्मा यांना निलंबित करावे आणि गुन्हे दाखल करण्याची कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेकापूर येथील पालकवर्ग आणि ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teacher's Disgrace! Drunk Teacher's Misconduct and Harassment in School.

Web Summary : A teacher in Shekapur, Maharashtra, was caught on video drunk at school, behaving inappropriately with students. Parents demand immediate suspension and legal action due to safety concerns and the teacher's detrimental impact on students.
टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी