जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळला जळालेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 19:57 IST2022-11-08T19:56:55+5:302022-11-08T19:57:40+5:30
अनुसयानगरच्या समोरील जंगलात जळलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला आहे.

जंगलात संशयास्पद अवस्थेत आढळला जळालेला मृतदेह
बिलोली (जि. नांदेड) : तालुक्यातील सगरोळीलगत असलेल्या अनुसयाजवळील जंगलात एका अज्ञात इसमाचा जळीत अवस्थेत मृतदेह मंगळवारी (दि. ८) सकाळी आढळला. हा खुनाचा प्रकार तर नाही ना, असा संशय या घटनेबाबत व्यक्त होत आहे.
अनुसयानगरच्या समोरील जंगलात जळलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी बिलोली पोलिसांच्या वतीने तपास चालू आहे. नेमका हा खून आहे की अन्य काही प्रकार आहे? याबाबत शोध घेतला जात आहे. घटनास्थळी प्रथमदर्शनी पाहता मृत व्यक्तीचे शरीर, अंगावरील कपडे जळून गेल्याने ओळख पटत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत बिलोली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती.
अधिक माहितीसाठी एएसआय बोधने यांच्याशी संपर्क साधला असता अजूनही तपास चालू असल्याचे सांगितले. हा मृतदेह सकाळी एका मुलास दिसल्यानंतर त्याने पोलिसांना ही माहिती दिली. ही घटना रात्री घडली असावी, असा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.