शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

८२१ वीजचोरांना कारवाईचा शॉक

By admin | Updated: February 13, 2015 15:12 IST

शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्यीक हानी अधिक असणार्‍या व भारनियमनातील एफ आणि जी गाटातील १८ फिडरवर २ ते ११ फेब्रुवारी २0१५ दरम्यान महावितरणने मोहीम राबवून वीजचोर शोध उपक्रम राबविला.

नांदेड : शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्यीक हानी अधिक असणार्‍या व भारनियमनातील एफ आणि जी गाटातील १८ फिडरवर २ ते ११ फेब्रुवारी २0१५ दरम्यान महावितरणने मोहीम राबवून वीजचोर शोध उपक्रम राबविला. या दहा दिवसाच्या मोहीमेत १५ हजार ६0८ ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येवून ८२१ ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा २00३ च्या कलम १२६ आणि १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. नांदेड शहरातील विजेची अतिहानी असलेल्या शहरातील सर्व उपविभागातील १८ फिडरवर मुख्य अभियंता आर.जी.शेख व अधिक्षक अभियंता डी.डी.हामंद यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकारी अभियंता डी.एच.आग्रवाल आणि त्यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व कर्मचार्‍यांनी वीजचोरी तपासणी मोहीम राबविली. गणेशानगर, चैतन्यनगर, नागार्जूना-एअरपोर्ट, सांगवी, महावीर सोसायटी, बिलालनगर, खुदबईनगर, टॉवर, खडकपूरा, रेल्वेट्रॅक, नागापूर गावठाण, गोपाळचावडी, चौफाळा, वाजेगाव, निळा, लिंबगाव, नाळेश्‍वर आणि मातासाब या फिडरवर ही मोहीम राबविण्यात आली. दहा दिवस चाललेल्या या मोहीमेत एकूण १५ हजार ६0८ ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येवून त्यात भारतीय विद्युत कायदा २00३ च्या कलम १२६ अतंर्गत ५७६ तर कलम १३५ नुसार २४५ वीज ग्राहकाविरुद्ध वीजचोरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच २८६ जणांचे वीज चोरीसाठी टाकलेले तारेवरचे आकडे काढण्यात आले.वीजचोराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असल्याने याचा वीजचोरी कमी होण्यास मदत होणार आहे. /(प्रतिनिधी)

 ■ मोहीमेत नांदेड मंडळातील २६0 तर नांदेड शहर विभागातील ९0 जनमित्र आणि विद्युत सहायकांनी काम केले. त्यांच्यावर १८ सहाय्यक अभियंत्याचे थेट नियंत्रण होते