भोकरमध्ये ट्रव्हल्सच्या अपघातात ८ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 15:05 IST2017-12-19T15:05:20+5:302017-12-19T15:05:41+5:30
नांदेड ते भोकर मार्गावर चालणाऱ्या खाजगी ट्रव्हल्ससचा आज सकाळी अपघात होऊन ८ प्रवासी गंभीर तर ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना भोकरपासून २ किमीवर सकाळी ९ वाजता घडली. गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

भोकरमध्ये ट्रव्हल्सच्या अपघातात ८ जण गंभीर जखमी
भोकर (नांदेड ) : नांदेड ते भोकर मार्गावर चालणाऱ्या खाजगी ट्रव्हल्ससचा आज सकाळी अपघात होऊन ८ प्रवासी गंभीर तर ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना भोकरपासून २ किमीवर सकाळी ९ वाजता घडली. गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी नांदेड ते भोकर मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूक करणा-या ट्रव्हल्सचे ( एम.एच.०५ आर ०४२ ) पुढील टायर अचानक फुटले. यामुळे ट्रव्हल्स एका झाडावर आदळून अपघात झाला. यात १२ जण जखमी झाले. यातील बाबाराव सीताराम मारकळ (४५) रा.जंगमवाडी नांदेड, बालाजी गणपतराव सोनटक्के (४५) रा.भोकर, आत्माराम तुकाराम जाधव (५०) रा.नांदेड, शिवाजी रामराव जाधव (४५) रा.भोकर, सुधीर दत्तात्रय अंबेकर (४६) रा. नांदेड, बालु सायलु पवळे (४६) रा.नांदेड, दत्तात्रय दामोदर पांचाळ (४३) रा. नांदेड, किशन भुजंगराव आंबटवार (४६) रा. नांदेड हि गंभीर जखमी झाली आहेत. तर किरकोळ जखमी असलेली अमंन गोविंदराव सामनकर, सदाशिव हरीभाऊ काळे, चक्रधर दत्तात्रय खामसाळे, रमेश किशनराव भुरे (सर्व रा.नांदेड) यांच्यावर उपचार करून घरी पाठवण्यात आले.
कमी भाडे आकारतात
जखमींमध्ये नांदेड - भोकर रोज येणेजाणे करणा-या शिक्षकांची संख्या जास्त आहे. भोकर ते नांदेड बस भाडे ५८ रुपये असून खाजगी वाहनधारक ३० ते ४० रुपय भाडे आकारतात. यामुळे यामार्गावर खाजगी प्रवासी वाहतूकीस मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळतो.