शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांमध्ये ७.२३ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:24 AM

जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे.

किनवट : जून महिन्याची २५ तारीख उजाडली तरी किनवट तालुक्यातील १९ प्रकल्पांत सरासरी ७.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. दहा प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. एक मध्यम प्रकल्पही जोत्याखाली येण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पाऊस वेळीच झाला नाही तर भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.कधी नव्हे ते यावर्षी प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. २०१८ च्या पावसाळ्यात झालेला कमी पाऊस हे त्याला कारणीभूत आहे. तर बहुतांश प्रकल्पांत पाणी कमी, गाळाचे प्रमाण अधिक असल्याने प्रकल्प कोरड्या स्थितीत दिसून येत आहेत.तालुक्यातील कुपटी, मुळझरा, थोरा, जलधारा, नांदगाव, अंबाडी, वरसांगवी, सावरगाव, शिरपूर, मांडवी या दहा प्रकल्पांनी तळ गाठला आहे. जोत्याखाली पाणी आले आहे तर डोंगरगाव या मध्यम प्रकल्पातही केवळ १.२३ टक्के इतकाच जलसाठा आहे. त्यामुळे वेळीच मोठा पाऊस पडला नाही तर हा प्रकल्पही जोत्याखाली येण्यास वेळ लागणार नाही.सद्य:स्थितीत असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा याप्रमाणे-नागझरी (१६.००), लोणी (१९.१३), निचपूर (१६.६६), सिंदगी (१६.९४), हुडी (१०.३८), पिंपळगाव (की) (१०.६६), निराळा (३६.७०), पिंपळगाव (भि) (९.६८).१८ प्रकल्पांत सद्य:स्थितीत केवळ ७ टक्के इतकाच जलसाठा आहे, हे विशेष! रोहिणी, मृग हे नक्षत्र कोरडे गेले आहे. आता २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्र सुरु झाले आहे. किनवट तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.किनवट तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडीतांडे असून वार्षिक पर्जन्यमान सरासरी १ हजार २४० मिलीमीटर इतके आहे. ८२ हजार ३६० हेक्टर इतके खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र असून जूनअखेरपर्यंत १७७ मिमी इतका पाऊस पडावयास हवा आहे़ पण, आजही पावसाची प्रतिक्षा आहे़

टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईDamधरण