शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:44 AM

लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले.

ठळक मुद्देपारा घसरला अन् मतदानाचा टक्का वाढला सकाळ-सायंकाळी मतदारांचा उत्साह

नांदेड: लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले. सकाळी आठ वाजेपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या़ नांदेड लोकसभेसाठी ६५.१५ टक्के मतदान झाले़ आदर्श मतदान केंद्रावर मतदारांचे तरुणींनी औक्षण करुन स्वागत केले़ तर सखी मतदान केंद्रावर मतदारांसाठी सेल्फी पॉर्इंट उभारण्यात आला होता़सोशल मीडियावर सबकुछ ‘व्होटिंग’प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत ‘फोटोसेशन’लादेखील ऊत आला होता अन् लगेच ‘सोशल मीडिया’वर ‘शेअर’ करणेदेखील सुरू होते. ‘मी मतदान केले’, ‘प्लीज, डू व्होट’ अशा पद्धतीच्या ‘मॅसेज’ची देवाणघेवाण सुरू होती. फेसबुकवर अनेकजण सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविल्याचे फोटो अपलोड करीत होते़ तर काहींनी चक्क ईव्हीएमद्वारे कुणाला मतदान केले याचे फेसबुक लाईव्ह केल्याचा प्रकार पुढे आला़चव्हाणांचे सहकुटुंब मतदानमाजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी पत्नी आ़अमिताताई चव्हाण यांच्यासह आंबेडकर नगर भागातील मनपा शाळेच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला़ सकाळी दहा वाजता त्यांचे मतदान केंद्रावर आगमन झाले़ यावेळी त्यांच्यासोबत इतर पदाधिकारीही होते़पहिल्या मतदानासाठी वेळेपूर्वीच केंद्रावरलोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदानाचा अधिकारी मिळाला़ त्यामुळे खुप एक्साईटमेंट होती़ त्यामुळे सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच मी मतदान केंद्रावर हजर होते़ मतदान केंद्रावरील प्रत्येक हालचाली मी नजरेने टिपत होती़ आपण आज पहिले मतदान करणार म्हणून अभिमानही वाटत होता़ लोकशाही सदृढ करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजाविलाच पाहिजे़ युवक-युवतींनीही राजकारणात पुढे येवून आपले प्रश्न सोडविण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया रोशनी राजपूतने दिली़१०४ वर्षाच्या आजीबार्इंचे मतदानशहरातील यशवंतनगर भागात असलेल्या राणी लक्ष्मीबाई शाळेच्या बुथ क्रमांक २०० वर १०४ वर्ष वय असलेल्या वेणूबाई गणपती फुके या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजाविला़ चालता येत नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आॅटोतून त्यांना मतदान केंद्रावर आणले होते़ केंद्राबाहेरच आॅटो उभा करावा लागल्याने नातेवाईकांनी वेणूबाई यांना उचलून घेवून मतदान केंद्रात नेले़ मतदानानंतर वेणूबाई यांनी आपण प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावित असल्याचे सांगितले़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडVotingमतदानAshok Chavanअशोक चव्हाण