गोदाम फोडून ४ लाखांचे खोबरे चोरांकडून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:54 IST2020-11-13T18:53:32+5:302020-11-13T18:54:25+5:30

चोरट्यांनी गोदामाचे शटर तोडून खोबऱ्याच ११० पोते लंपास केले.

4 lakh coconuts were stolen from a warehouse by thieves | गोदाम फोडून ४ लाखांचे खोबरे चोरांकडून लंपास

गोदाम फोडून ४ लाखांचे खोबरे चोरांकडून लंपास

ठळक मुद्देसिडकोतील एमआयडीसी भागातील गोदाम फोडले२ हजार ७५० किलो खोबरे चोरट्यांनी पळवले.

नांदेड :  सिडकोतील एमआयडीसी भागातील बिएसनएल टाॅवर समोर असलेल्या गोदामातून चोरट्यांनी ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचे खोबरे लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यापार्यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

देगलूर नाका येथील व्यापारी सादिक खान हाजी खान यांचे सिडको एमआयडीसी भागात बिएसएनएल टाॅवर समोर गोदाम आहे. हे गोदाम ८ ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी बंद केले होते. चोरट्यांनी गोदामाचे शटर तोडून खोबऱ्याच ११० पोते लंपास केले. या प्रत्येक पोत्यामध्ये २५ किलो खोबरे होते. २ हजार ७५० किलो खोबरे चोरट्यांनी पळवले. या खोबऱ्याची किमत बाजार भावाप्रमाणे ४ लाख १२ हजार ५०० रुपये असल्याचे व्यापारी सादिक खान यांनी सांगितले. या चोरी प्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.जी.कासले हे करीत आहेत. 
 

Web Title: 4 lakh coconuts were stolen from a warehouse by thieves