शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

बचत खात्यातून परस्पर ४ लाख ३५ हजार उचलले; हिमायतनगर येथे डाक अधिकाऱ्यासह कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 8:33 PM

बचत अकाउंटमधून परस्पर लाखो रुपयाची रक्कम उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

हिमायतनगर (नांदेड) : येथील उपडाक विभागाच्या कार्यालयात खातेदाराच्या बचत अकाउंटमधून परस्पर लाखो रुपयाची रक्कम उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तत्कालीन डाक अधिकारी व एक कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. 

हिमायतनगर येथे भारतीय डाक विभागाचे उपडाक कार्यालय आहे़ तत्कालीन पोस्ट मास्टर शे. महेबूब व त्यांचा सहाय्यक चव्हाण यांच्या माध्यमातून रक्कमेची उचला-भरणा करण्याचे काम चालत होते. या दोघांनाही संगनमत करून येथील ग्राहक विठ्ठल बाबा कोमावार यांच्या बचत खात्यातून ४ लक्ष ३१ हजार ३३ रुपयांपैकी ४ लक्ष ३० हजार ९५३ रुपयाची रक्कम परस्पर उचलली. त्यामुळे १ एप्रिल रोजी त्यांच्या खात्यााकेवळ ८४ रुपये शिल्लक राहिले़ ही बाब स्टेटमेंट काढल्यानंतर लक्षात आली. त्यामुळे आपल्या सहीशिवाय परस्पर रक्कम उचलल्याची तक्रार खातेदाराचे नातू साईनाथ कोमावार यांनी नांदेड डाक विभागाच्या वरिष्ठांकडे केली होती. 

त्यानुसार वरिष्ठ डाक अधिकारी लिंगायत आणि भोकर येथील चौकशी अधिकारी पदमे तसेच अन्य तिघांनी हिमायतनगरच्या उपडाक कार्यालयास भेट देऊन चौकशी केली. यावेळी तत्कालीन डाक अधिकारी यांच्या कार्यकाळातील सर्व अभिलेखे जप्त करण्यात आले. दरम्यान, आणखी काही ग्राहकांच्या खात्यातून अशाच पद्धतीने रक्कम उचलल्याचा संशय असून परस्पर उचललेली काही रक्कम संबंधितांनी जमा केल्याचेही सांगितले जात जात आहे़  

पडताळणी करण्यात येत आहे या प्रकरणाची चौकशी सुरुकरण्यात आली असून आणखी आठ-दहा दिवसात नेमका किती रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, ते स्पष्ट होईल़  प्रत्येक खातेदाराला विचारपूस करून रक्कमेची पडताळणी करण्यात येत आहे़ ग्राहकांनी कसलाही गैरसमज करून घेऊ नये, दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल-एस.बी.लिंगायत,  सुपरिंटेंडेंट आॅफिसर

सखोल चौकशी करावी शासन व जनतेची फसवणूक करून रक्कमेची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकारानी सबंधित दोषींवर कलम ४२० नुसार कारवाई करण्याची आवश्यकता आहे़ डाक विभागाने सदर प्रकरण गांभीर्याने घेवून वरील कर्मचाऱ्यांनी आणखी काय गैरव्यवहार केला आहे का याचीही सखोल चौकशी करायला हवी- साईनाथ कोमावार, रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य

टॅग्स :fraudधोकेबाजीPost Officeपोस्ट ऑफिसPoliceपोलिस