प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 05:46 IST2025-02-17T05:45:33+5:302025-02-17T05:46:14+5:30

ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मृतांत नांदेडच्या तिघांचा, तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे.

4 devotees going to Prayagraj killed in accident 19 others injured | प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी

प्रयागराजला गेलेले ४ भाविक अपघातात ठार ; अन्य १९ जण जखमी

नांदेड : प्रयागराज महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात होऊन ४ भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १९ जण जखमी झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मृतांत नांदेडच्या तिघांचा, तर हिंगोलीच्या एका महिलेचा समावेश आहे.

नांदेडमधील छत्रपती चौक परिसरात राहणारे सुनील दिगंबर वरपडे (५०), अनुसया दिगंबर वरपडे (८०), दीपक गणेश गोदले (४०) आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण (५०) यांचा अपघातात मृत्यू झाला. १९ जखमींना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

Web Title: 4 devotees going to Prayagraj killed in accident 19 others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात