नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

By शिवराज बिचेवार | Updated: August 12, 2022 10:06 IST2022-08-12T10:05:50+5:302022-08-12T10:06:20+5:30

शोरुम शेजारी रुग्णालय होते, वेळीच आग विझल्याने पुढील अनर्थ टळला

25 electric bikes burn in showroom fire in Nanded | नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

नांदेडमध्ये शोरुमच्या आगीत २५ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक

नांदेड: नांदेडमध्ये आज सकाळी एका इलेक्ट्रिक बाईकच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयांच्या बाईक जळून खाक झाल्या आहेत, नवा मोंढा भागातील इलेक्ट्रिक बाईकच्या दुकानाला सकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली होती. 

फायर ब्रिग्रेडने घटनास्थळी धाव घेत आग विझवलीय मात्र तोवर 25 इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्या तसेच दुकानातील अन्य साहित्य देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. 

दरम्यान, याच इमारतीत एक खाजगी रुग्णालय आहे , ही आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णांना आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.

Web Title: 25 electric bikes burn in showroom fire in Nanded