मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:04 IST2019-04-30T00:03:24+5:302019-04-30T00:04:09+5:30

शहरात २८ एप्रिल रोजी तहेजीब फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या १३ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो़

24 couples married in Muslim community | मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध

मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध

ठळक मुद्देतहेजीब फाऊंडेशनचा १३ वर्षांपासून पुढाकार, गरजूंना मोठा आधार

हिमायतनगर : शहरात २८ एप्रिल रोजी तहेजीब फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील २४ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या १३ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो़
गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून गरीब कुटुंबाला खर्च करणे जड जात आहे. त्यामुळे अनेक समाजात सामूहिक विवाहाचे आयोजन करणे काळाची गरज बनली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सामुदायिक विवाह सोहळ्याचा मोठा आधार होत आहे़
मुस्लिम समाजाच्या हितासाठी तेहजीब फाऊंडेश समोर आली असून १३ वर्षांपासून समाजकार्य करत आहे.
यावेळी २४ जोडप्यांचा सामूहिक विवाह थाटात लावून दिला. विवाहित जोडप्यांना फाऊंडेशनतर्फे संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अ. वाहिद, मजहर मौलाना, उपनगराध्यक्ष मो. जावेद, रफिक, नगरसेवक फिरोज खान, खुदुस मौलाना, सय्यद मनान, शेख आदिल, शेख इब्राइम, खलील मौलाना, फहाद खान पठान, नवीद यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: 24 couples married in Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.