राज्यात फौजदारांच्या २३६० जागा रिक्त; सहायक उपनिरीक्षक, पोलीस अंमलदारांना बढतीची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 12:14 PM2022-03-09T12:14:20+5:302022-03-09T12:18:12+5:30

पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस उपनिरीक्षक बनविले जाणार आहे.

2360 vacancies for faujdars in the state;Opportunity for promotion to Assistant Sub-Inspector, Police Officers | राज्यात फौजदारांच्या २३६० जागा रिक्त; सहायक उपनिरीक्षक, पोलीस अंमलदारांना बढतीची संधी

राज्यात फौजदारांच्या २३६० जागा रिक्त; सहायक उपनिरीक्षक, पोलीस अंमलदारांना बढतीची संधी

googlenewsNext

नांदेड : राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या तब्बल २ हजार ३६० जागा रिक्त असून, त्यात सर्वाधिक मुंबईचा समावेश असलेल्या कोकण विभाग-२ मध्ये आहेत. दरम्यान, यातील रिक्त जागा भरण्यासाठी सहायक उपनिरीक्षक तथा पोलीस हवालदारांना बढती दिली जाणार आहे.

राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी ७ मार्चरोजी फौजदारांच्या रिक्त जागांची स्थिती जाहीर केली. त्यानुसार, एकूण ७ महसूल विभागात २३६० जागा रिक्त आहेत. कोकण-२ मध्ये १६२२, नागपूर-२५६, नाशिक व पुणे प्रत्येकी १४७, अमरावती १०२, कोकण १-८०, तर औरंगाबाद विभागात ४९ जागा रिक्त आहेत. फौजदारांच्या यातील जागा पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. पोलीस अंमलदारांना बढती देऊन पोलीस उपनिरीक्षक बनविले जाणार आहे. त्याअनुषंगाने पदोन्नतीच्या यादीतील अंमलदारांचा महसुलीत पसंतीक्रम मागण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून बढतीची प्रतीक्षा
राज्य पोलीस दलातील अंमलदारांना अनेक वर्षांपासून फौजदार पदावरील बढतीची प्रतीक्षा होती. अखेर शासनाने १४ जुलै २०२१ रोजी त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे फौजदार होण्याचे अंमलदारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत कित्येक अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पदोन्नतीची ही यादी लवकर न निघाल्यास आणखी काही अंमलदार सेवानिवृत्त होण्याची व त्यांचे फौजदार होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: 2360 vacancies for faujdars in the state;Opportunity for promotion to Assistant Sub-Inspector, Police Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.