शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अर्धापर दंगलप्रकरणी १८ संशयित ताब्यात; दोन्ही गटातील २५० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 7:07 PM

Ardhapur riot case : दंगलग्रस्त भागात पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची पाहणी

अर्धापूर  : -  जिममध्ये व्यायाम करतांना दोन युवकांमध्ये झालेल्या वादातून बुधवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी  पोलिसांनी १८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर दोन्ही गटातील २५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अर्धापुरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलग्रस्त भागाला पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी पाहणी केली.  ( 18 suspects arrested in Ardhapur riot case) 

बुधवारी दि.३० रोजी रात्री ९ :३० वाजेच्या दरम्यान अर्धापूर शहरातील एका खाजगी जिममध्ये युवक व्यायाम करीत असतांना एका युवकाचा दुसऱ्या युवकांसोबत वाद झाला. याप्रसंगी मारहाण झालेला व मारहाण करणारे दोन्ही गट तलाव मैदान, मारोती मंदिर परिसरात समोरासमोर आले. यावेळी दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात दगड फेक करण्यात आली.शहरातील सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केली. यात ४ चारचाकी गाड्या आणि ३ दुचाकी गाड्या, पानठेले तिन,मेडिकल दुकान,जयप्रकाश गट्टाणी यांचे रंग भांडार असे एकूण १० लाख रुपयांचे नुकसान या दंगलीत झाले आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अशोक जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.नांदगावकर,पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे,साईनाथ सुरवशे,के.के.मांगुळकर,सपोउपनी विद्यासागर वेदै,बाबुराव जाधव,जमादार भिमराव राठोड,पप्पू चव्हाण,संजय घोरपडे,राजेंद्र वरणे,राजकुमार कांबळे,संजय घोरपडे,कल्याण पांडे,महेंद्र डांगे,गुरूदास आरेवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते फिरदोस हुसेनी व होमगार्ड यांनी वेळीच जाऊन कारवाई केली. 

या दंगलप्रकरणी दोन्ही गटातील २५० जना विरूद्ध ३०७, ३५३, ३३६, ३३७, १४३, १४७, १४८,१४९,४२७,१८८,२६४,२७०व १३५ म.पो.अधिनियम ३,४ या सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगलग्रस्त भागाला पोलीस उपमाहानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजंनगावकर,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह अनेकांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. व्यापा-यांच्या भेटी घेऊन अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सध्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, क्यूआरटीचे आणि आरसीपीचे जवान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

निरपराधांवर कारवाई नकोदोषी असलेल्यांवर कारवाई करावी. मात्र निरपराधांन विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्या कडे शिवसेना जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे,उपजिल्हा प्रमुख दत्ता पांगरीकर यांनी केली आहे.

चौकशीकरून पुढील कारवाई१६८ - नुसार गुन्हा दाखल झाला असून १८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करून पुढील कारवाई सुरू आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावे आपल्या सुरक्षेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही माहिती असेल तर ती पोलिस अधिकाऱ्यांना द्यावी. शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन या वेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड