शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

नांदेड जिल्ह्यात १४६१ कोटींची कर्जमाफी मिळणार; पहिल्या यादीत ४२३ शेतकऱ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 19:27 IST

या योजनेचा प्रारंभ जिल्ह्यातील लोहा तालुका सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देमहात्मा फुले कर्जमुक्ती योजना२ लाख १९ हजार ६३२ शेतकरी पात्र

नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात २ लाख १९ हजार ६३२ शेतकरी योजनेस पात्र ठरले असून या शेतकऱ्यांना १४६१ कोटी ३६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. या योजनेचा प्रारंभ जिल्ह्यातील लोहा तालुका सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा (बु) येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा प्रारंभ जिल्ह्यात लोहा व अर्धापूर तालुक्यात करण्यात आला आहे. सोनखेड व कामठा बु. येथे थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. या गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पथदर्शी प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे. सोनखेड येथील २६१ व कामठा बु. येथील १६२ शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर आहे. त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जात आहे. 

सदरच्या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवाकेंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यात काही त्रुटी आढळल्यास त्याची शहानिशा करुन त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी स्पष्ट केले आहे. कामठा बु. व सोनखेड येथील आधार प्रमाणिकरणाच्या कामाची पाहणी जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, अर्धापूरचे तहसीलदार सुजीत नरहरे यांनी केली. त्यांच्या हस्ते आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोचपावत्यांचे वितरणही करण्यात आले. 

जिल्ह्यात २ लाख १९ हजार ६३२ शेतकऱ्यांपैकी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असे जिल्हा उपनिबंधक फडणीस यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात असलेल्या एकूण १ हजार ५४५ आपले सरकार केंद्र व जिल्ह्यातील बँकस्तरावर आधार प्रमाणिकरणाचे काम केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र तसेच बँकेत जाताना शेतकऱ्यांनी आधारकार्ड, यादीमधील क्रमांक, बचतखाते पुस्तक, मोबाईलसोबत घेवून जावे. तसेच आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे. 

योजनेच्या अंमलबजावणीसाठी सज्ज-इटणकरमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी स्पष्ट केले. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे ते म्हणाले.४ जिल्ह्यात २ लाख १९ हजार ६३२ थकबाकीदार शेतकरी सभासद या योजनेस पात्र ठरले आहेत. त्यांना १४६१ कोटी ३६ लाखांचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. हे सर्व शेतकरी कर्जमुक्त होतील, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात २४ फेब्रुवारीपर्यंत १ लाख ९५ हजार ६६१ शेतकऱ्यांची माहिती बँकेद्वारे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकेद्वारे अपलोड करण्यात येत आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीfundsनिधी