शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जि.प. ८५, पं.स.च्या ११६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८५ जिल्हा परिषदेच्या व ११६ पंचायत समितीच्या जागा रिक्त ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८५ जिल्हा परिषदेच्या व ११६ पंचायत समितीच्या जागा रिक्त केल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांचा लवकरच निवडणूक कार्यक्रम आयोग जाहीर करणार आहे. आयोगाने यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

रिक्त झालेल्या ८५ सदस्यांमध्ये नागपूर, धुळे, वाशीम, पालघर, नंदूरबार व अकोला जिल्हा परिषदेचा समावेश आहे. या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गेली होती. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसवावे, असे आदेश राज्य सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ५० टक्के आरक्षणातून अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण वजा करून उरलेल्या टक्केवारीत ओबीसींचे आरक्षण बसवावे असे स्पष्ट केले असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या सहाही जिल्हा परिषदेच्या व ४४ पंचायत समितीच्या सदस्यांचे सदस्यत्व ४ मार्चपासून रद्द केले. त्या संदर्भातील पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून, ९ तारखेपर्यंत संबंधित सदस्यांना कळवावे व त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा, असे आयोगाने आदेशित केले आहे. आयोग या रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार आहे.

- सहा जिल्हा परिषदेत ओबीसींच्या रिक्त झालेल्या जागा

नागपूर - १६

पालघर - १५

धुळे - १५

अकोला - १४

वाशीम - १४

नंदूरबार - ११