शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जिल्हा परिषद निवडणूक : नागपुरात भाजपच्या गडाला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 21:13 IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे.

ठळक मुद्दे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घरवापसी शिवसेनेचा स्वबळाचा नारा फुसका, केवळ एका जागेवर विजय शिवसेनेचा स्वबळाचा नारा फुसका, केवळ एका जागेवर विजय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसला ३० तर राष्ट्रवादीला १० जागांवर विजय मिळाला आहे. भाजपचा विकासरथ मात्र जिल्ह्यात केवळ १५ जागांवर थांबला. इकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेलाही मतदारांनी नाकारले आहे. शिवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. जिल्ह्यात (रामटेक) सेनेचा खासदार असताना शिवसेनेचा बाण मात्र मोडला.

काटोल तालुक्यातील शेकाप आणि उमरेड तालुक्यातील अपक्ष विजयी उमेदवाराने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने, हे संख्याबळ आता ४२ वर पोहोचले आहे.जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. यात कॉँग्रेसने ४२ तर राष्ट्रवादीने १६ जागांवर निवडणूक लढविली होती. तर दोन सर्कलमध्ये या दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत झाली होती.महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यात कॉँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. यातील दोन मंत्र्यांचे मतदार संघ ग्रामीण भागात मोडतात. येथे दोन्ही पक्षांना दमदार यश मिळाले आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघात मोडणाºया काटोल तालुक्यात राष्ट्रवादीला दोन, शेकाप (राष्ट्रवादी समर्थित) एका जागेवर विजय मिळवला आहे. नरखेड तालुक्यातील चारही जागावर आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. येथे राष्ट्रवादीला तीन तर काँग्रेसचा एका जागेवर विजय झाला.राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघातील सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यात भाजपला खातेही उघडता आले नाही. कळमेश्वर तालुक्यातील तीन आणि सावनेर तालुक्यातील सहाही जागावर काँग्रेसने दमदार विजय मिळविला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे मूळगाव असलेल्या धापेवाडा जि.प. सर्कलमध्ये भाजपचे २० वर्षांचे वर्चस्व मोडित काढत काँग्रेसने हात उंचावला आहे. यासोबतच राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहत असलेल्या कामठी तालुक्यातील कोराडी सर्कलमध्ये कॉँग्रेसने पुन्हा विजय मिळविला आहे.पंचायत समितीत कॉँग्रेस नंबर १नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या ११६ गणात ५९ जागांवर काँग्रेसने ताबा मिळवला आहे. यानंतर भाजप (२४), राष्ट्रवादी (२३), शिवसेना (७) आणि अपक्ष (इतर) ३ जागावर विजय मिळाला आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांवर या दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता येणार आहे.आजी-माजी मंत्री पुत्र जिंकलेकाटोल तालुक्यातील मेटपांजरा सर्कलमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र राष्ट्रवादीचे सलील देशमुख मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी भाजपचे प्रवीण अडकिने यांचा ४,३९४ मतांनी पराभव केला. देशमुख यांना १०,०३१ तर अडकिने यांना ५,६३७ मते मिळाली.हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कलमध्ये माजी मंत्री रमेश बंग यांचे पुत्र राष्ट्रवादीचे दिनेश बंग विजयी झाले. त्यांनी भाजपचे विकास दाभेकर यांचा पराभव केला. बंग यांना ६,९८६ तर दाभेकर ४,९८५ मते मिळाली. येथे काँग्रेसचे बाबा आष्टनकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. आष्टनकर यांना ४,६८३ मते मिळाली.बावनकुळेंवरील अन्यायाचा पुन्हा फटकाराज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेत उमेदवारी नाकारल्याचा मोठा फटका विदर्भात भाजपला बसला होता. त्याचे प्रत्यंतर नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातही दिसून आले. नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसला. बावनकुळे यांच्या नेतृत्वात कामठी तालुक्यातील दोन, मौदा तालुक्यातील दोन जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले.बावनकुळे यांनी पालकमंत्री या नात्याने गेली पाच वर्षे जिल्ह्याचे नेतृत्व केले होते. मात्र विधानसभेत उमेदवारी नाकारल्याने पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज होते. ते आजच्या निकालातून दिसून आले.नागपूर जिल्हा परिषद निकालएकूण जागा -५८कॉँग्रेस - ३०राष्ट्रवादी कॉँग्रेस- १०भाजप - १५शिवसेना - १शेकाप -१अपक्ष - १नागपूर जिल्हा पंचायत समिती निकालएकूण जागा - ११६कॉँग्रेस -५९राष्ट्रवादी कॉँग्रेस- २३भाजप - २४शिवसेना - ०७इतर - ३

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा