शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

स्वत:ला नेता बनविणारी युवा संघर्ष यात्रा; आमदार राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

By मंगेश व्यवहारे | Published: December 11, 2023 11:41 AM

स्वत:चे घरपरिवार सोबत घेऊन निघालेली ही संघर्ष यात्रा आहे. स्वत:च्या गुडघ्याला बाशिंग बांधून नेता बनण्याचा हा प्रयत्न आहे, असेदेखील आमदार राम शिंदे म्हणाले. 

नागपूर : ‘आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा ही स्वत:ला नेता बनविणारी यात्रा आहे,’ अशी टीका भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य राम शिंदे यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली ही यात्रा रविवारी उपराजधानीत दाखल झाली. येथे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. रोहित पवार यांच्या या यात्रेबाबत बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले,‘रोहित पवार यांचे काका उपमुख्यमंत्री अजित पवार सांगताहेत की रोहित पवार यांनी जीवनात कधीही संघर्ष केला नाही.

विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी या यात्रेला बालमित्र मंडळाची यात्रा संबोधिले आहे. वास्तविक पाहता जे जीवनात संघर्ष करतात तेच आपले अनुभव मांडतात आणि लोकांपुढे आदर्श ठरतात. पण, रोहित पवार यांनी जी संघर्षयात्रा काढली त्यात डीजेपुढे डान्स केला, स्वत:वर फुले उधळूण घेतली. कापूस वेचण्याचा नौटंकीपणा केला. विहीरीत सैराट उड्या मारल्या. अशा प्रकारे एकमेकांच्या हातात हात घेऊन ही संघर्षयात्रा सुरू आहे.’ 

फुसका बार आउटसोर्सिंगच्या संदर्भात उद्धव ठाकरेंच्या काळात जो शासन निर्णय काढण्यात आला होता. तो विद्यमान सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा फुसका बार निघाली आहे. स्वत:चे घरपरिवार सोबत घेऊन निघालेली ही संघर्ष यात्रा आहे. स्वत:च्या गुडघ्याला बाशिंग बांधून नेता बनण्याचा हा प्रयत्न आहे, असेदेखील आमदार राम शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Ram Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन