शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो कुशल उद्योजक बना - फुके

By admin | Updated: August 15, 2014 00:43 IST

युवकांनी कुशल उद्योजक होऊन देशाची युवाशक्ती बनून परिवर्तन घडवावे. नोकरीच्या शोधात न फिरता स्वयंरोजगाराकडे वळून स्वयंनिर्भर व्हावे, असे आवाहन जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक

स्वयंरोजगार शिबिर : जनसंग्राम व सिद्घिविनायक ग्रूपचा उपक्रमनागपूर : युवकांनी कुशल उद्योजक होऊन देशाची युवाशक्ती बनून परिवर्तन घडवावे. नोकरीच्या शोधात न फिरता स्वयंरोजगाराकडे वळून स्वयंनिर्भर व्हावे, असे आवाहन जनसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष नगरसेवक डॉ. परिणय फुके यांनी केले. जनसंग्राम फाऊंडेशन व सिद्घिविनायक ग्रुप, अमरावतीतर्फे विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड येथे दोन दिवसीय स्वयंरोजगार व उद्योजक विकास शिबिर आयोजित करण्यात आले. दोन दिवसीय शिबिरात हजारोच्या संख्येने युवक-युवती व महिला सहभागी झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र औद्योगिक फार्मिंग फेडरेशनचे विक्रम बोके, डॉ. शरद निंबाळकर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश मांजरीकर, गजानन बोंडे, राजीव देशपांडे, सुरेश खोंडे, विकास जैन, प्रफुल्ल काळे, विजय धावटे, एस़ आऱ सूर्यवंशी, सुनील नेरकर, प्रकाश भागवतकार, शेख अब्दुल वहीद, विपन कुमार, टी.व्ही़ रामणमूर्ती, डी.बी़ मेंडके, विजय संजान, ए.बी़ मशानकर, नरेंद्र जिचकार उपस्थित होते़ पहिल्या दिवशी जागतिक बाजारपेठ व भारत दुग्धव्यवसाय प्रक्रिया उद्योग, महिला सबलीकरण व महिलांचा उद्योगात सहभाग व आव्हाने, उद्योगाला लागणारे भांडवल व बँकेचा सहभाग, भारतीय युवकांचा परदेशात औद्योगिक सहभाग, कृषी प्रक्रिया युवकांचा यांत्रिकी सहभाग, व्यवसाय व आरोग्य व्यवस्थापन, ब्युटी पार्लर व स्वयंरोजगार व्यवस्थापन या विषयावर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठ फळ प्रक्रिया पपई, मोसंबी, ज्यूस, टुटीफ्रूटी, चेरी, जाम जेली आदींचे बाजारपेठ तंत्रज्ञान कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले़ शेवटी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शोएब अली मीर साहेब, संचालक, केंद्रीय सेन्सर बोर्ड, उद्धवराव गाडेकर (महाराज) प्रचारक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रम, पाटसूल, सुरेशराव खोंडे, डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, विजय संतान, डी.बी़ मेंडके, गजानन वाघ, राजीव देशपांडे, बाबूराव जीभकाटे, नरेंद्र जिचकार, राजीव गायकवाड, प्रवीण ठावरे आदी उपस्थित होते़सूत्रसंचालन सचिन डोये, प्रास्ताविक अतुल घुईखेडकर यांनी केले. आभार अनंत जगनित यांनी मानले़. नितीन फुके, आशिष मनकवडे, शेखर मनकवडे, मंगेश तागडे, चंचल निमसडे, अभिलाष धानोरकर, घनश्याम अजागिया आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)