नागपुरातील कापसी येथे युवक पुरात वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:43 IST2018-07-07T00:41:48+5:302018-07-07T00:43:00+5:30

भंडारा मार्गावरील महालगाव कापसी येथे शुक्रवारी मासोळी पकडण्यासाठी गेलेला आशिष भरत नागपुरे(२५) हा युवक नाल्याच्या पुरात बुडाला.

The youth was drowned in the Kapsi area of ​​Nagpur | नागपुरातील कापसी येथे युवक पुरात वाहून गेला 

नागपुरातील कापसी येथे युवक पुरात वाहून गेला 

ठळक मुद्देअतिवृष्टीचा बाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा मार्गावरील महालगाव कापसी येथे शुक्रवारी मासोळी पकडण्यासाठी गेलेला आशिष भरत नागपुरे(२५) हा युवक नाल्याच्या पुरात बुडाला.
नागेश्वर नगर येथील रहिवासी आशिष भरत नागपुरे हा दुपारी १.३० च्या सुमारास त्याचा मित्र मुकुंदा पांडुरंग निमजे व नीतेश देवराव निमजे यांच्यासोबत मॉ उमिया वसाहतीजवळच्या नाल्यावर मासोळी पकडण्यासाठी आला होता. आशिष पाण्यात उतरला. मात्र जोराचा पाण्याचा प्रवाह असल्याने तो बुडायला लागला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. उलट मदत करताना दोघेही बुडायला लागले होते. त्यांना पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे यांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. रात्री उशिरापर्यत आशिषचा शोध लागला नव्हता.

Web Title: The youth was drowned in the Kapsi area of ​​Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.