शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:57 PM

तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर श्रामणेर शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले. 

तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने वाट थाई सिरीराजगीर, नालंदा यांच्यावतीने विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती व सूजाता बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १८ मे दरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा ससमारोप शनिवारी दीक्षाभूमीच्या परिसरात सायंकाळी झाला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.व्यासपीठावर थायलंड येथील फ्रा सरीत काय, फ्रा आर्यमिता, भदन्त विरीयज्योती, भदन्त नागघोष, भदन्त नागवंश, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.अष्टांगिक मार्ग हा मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितकी या मार्गाने वाटचाल करील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल, असे मार्गदर्शन भदन्त नागघोष यांनी केले. भदन्त नागवंश म्हणाले,बौद्ध धम्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.संचालन निर्वाण शिंदे यांनी केले तर आभार शरद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशांत ढेंगरे, इंद्रपाल वाघमारे, निर्वाण शिंदे, विलास गजघाटे, शरद मेश्राम, विशाल कांबळे, यशवंत चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. दरम्याण श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्यांनी दीक्षाभूमीच्या परिसरात मेणबत्ती हातात घेऊन बुद्धं, सरणं, गच्छामीच्या निनादात रॅली काढली.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी